वाघाच्या जंगलावर शिकाऱ्यांची नजर

161

कोल्हापूरातील राधानगरीत महिन्याभरापासून अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या वाघाच्या जंगलात आता शिका-यांनी प्रवेश केला आहे. वाघापाठोपाठ, रंगमिश्रित बिबट्याच्या दर्शनानंतर राधानगरी परिसरात नुकतेच शिकारीचे प्रकरण उघडकीस आले आहे. वाघाच्या अधिवासासाठी त्याचे खाद्य असणा-या भेकरालाच शिका-यांनी आपले लक्ष्य केल्याचे तपासाअंती वनाधिका-यांच्या लक्षात आले.

( हेही वाचा : भारत सरकारचे ‘हे’ अ‍ॅप वीज पडण्यापूर्वी नागरिकांना करणार सतर्क)

वनाधिकाऱ्यांनी दिली माहिती

१८ मे रोजी तीन शिका-यांनी राधानगरीतील जंगलात जाऊन भेकराची शिकार केली. याबाबत वनाधिका-यांना माहिती मिळताच तिन्ही आरोपींना त्याच दिवशी पकडले गेले. भेकराच्या मांसाच्या तुकड्याचे वाटप सुरु असतानाच वनाधिका-यांनी आरोपींना रंगेहाथ पकडले. कोंडिबा डवर, राजेंद्र पाटील, ओंकार पताडे असे या तिन्ही शिका-यांची नावे आहेत. तिन्ही आरोपी राधानगरीतील सावर्धन गावात राहतात. आरोपींची रवानगी सेंट्रल जेलमध्ये केली असून, त्यांनी जामीनासाठी अर्जही केल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली.

काही दिवसांच्या वास्तव्यानंतर रंगमिश्रित बिबट्याचेही दर्शन झाले होते. आता हा बिबट्या राधानगरीत दिसून येत नसल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली. वाघ अद्याप राधानगरीत असल्याने जंगलात पहारा वाढवल्याची माहिती दिली गेली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.