भंडाऱ्यात नागरी वसाहतीजवळ आली वाघीण, वनाधिकाऱ्यांनी असे पकडले

भंडाऱ्यात गेल्या तीन दिवसांपासून मानवी वस्तीजवळ वाघीणीचा संचार दिसून आल्याने गावकरी चांगलेच घाबरले. बुधवारी सकाळी मांडेसर येथील शेतात रानडुक्कर मारल्याने गावकरी अजूनच घाबरले. गावकऱ्यांनी वाघीणीचा पाठलाग सुरु केल्याने वाघीणीकडून माणसावर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेरिस पोलिसांनी गावकऱ्यांची गर्दी कमी झाल्यानंतर तब्बल चार तासांनी वनविभागाने वाघीणीला जेरबंद केले. या घटनेनंतर भंडाऱ्यात संघर्षाची परिस्थिती वाढू नये, अशी आशा वन्यजीव अभ्यासक व्यक्त करत आहेत.

( हेही वाचा : मुंबईतील १ लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी दहा हजारांचे कर्ज मंजूर, पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी कर्ज वाटप)

मांडेसर गावापासून १५ ते २० किलोमीटरवर नाकाडोंगरी जंगल परिसर आहे. नाकाडोंगरी नागपूर येथील पेंच अभयारण्याशी संलग्न असल्याने या भागांत ७-८ वाघ दिसून येतात. वाघ अभावानेच शहर भागांत येतात. ब-याच वर्षानंतर मांडेसर येथील मिरचीच्या शेतात अंदाजे अडीच वर्षांची वाघीण आढळली. या वाघीणीमुळे गावकरी भयभीत झाले. बुधवारी रानडुक्कर मारल्याने गावक-यांनी वाघीणीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु वाघीण घटनास्थळापासून पळून गेली. वाघीणीला पकडण्यासाठी भंडारा, गोंदिया आणि नवेगाव नागझिरा येथील वन्यप्राणी बचाव पथक प्रयत्न करत होते. दुपारी साडेचारच्या सुमारास वाघीणाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात वनाधिका-यांना यश आले.

या घटनेनंतर तरुण वयातील वाघांना खुणावणा-या प्रदेशाबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले. वाघीणीची शारिरीक तपासणी करण्यात आली असून, तिची तब्येत व्यवस्थित आहे. वाघीणीला रात्री नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, असे वनाधिका-यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here