मागच्या अनेक दिवसांपासून कर्मचा-यांच्या कपातीच्या बातम्या वारंवार ऐकू येत आहेत. आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना नारळ दिला आहे. आता टिकटाॅकनेही मोठ्या संख्येने कर्मचा-यांना कामावरुन काढून टाकले आहे. सध्याच्या घडीला या कंपनीकडून सर्वच भारतीय कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर, 40 जणांना पिंक स्लीप देण्यात आली आहे.
पुढील 9 महिन्यांचा पगार कर्मचा-यांना दिला जाईल, असे सांगून त्यांना कामावरुन काढण्यात आले आहे. टिकटाॅक इंडियाच्या कर्मचा-यांना 28 फेब्रुवारी हा त्यांच्या कामाचा अखेरचा दिवस असेल, असेही सांगण्यात आले आहे.
( हेही वाचा: इस्त्रोच्या ‘छोट्या राॅकेट’चे दुसरे यशस्वी उड्डाण, EOS 07 सह तीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण )
भारतीय कर्मचारी लक्ष्य?
भारत सरकारकडून 2020 या वर्षात साधारण 300 चिनी अॅप्सवर राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या क्षणापासून भारतात कधीच हे अॅप्स रिलाॅंच झाले नाहीत. टिकटाॅकचाही त्यात समावेश आहे. याच परिस्थितीत आता टिकटाॅकच्या कर्मचा-यांना काढून टाकण्यात आले आहे.
भारतीय स्टार्टअप आणि आयटी कंपनीने काढले किती कर्मचारी?
- BYJU’s- 1500 कर्मचारी
- Wipro-450 कर्मचारी
- InMobi- 70 कर्मचारी
- GoMechanic- 770 कर्मचारी
- DealShare- 770 कर्मचारी
- Medi Buddy-200 कर्मचारी
- Extol- 142 कर्मचारी
- Coindex- 90 कर्मचारी
- Ola- 200 कर्मचारी