तुमचा डॉक्टर पॉझिटिव्ह तर नाही ना! आतपर्यंत राज्यात २९१ निवासी डॉक्टरांना कोरोना

यंदाच्या आठवड्याच्या सुरुवातीपासून राज्यातील विविध सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण होत आहे. आतापर्यंत राज्यभरातील २९१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर (मार्ड) या निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून दिली गेली. निवासी डॉक्टरांना दर दिवसा कोरोनाची लागण होत असल्याने रुग्णसेवेवर ताण येण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोणत्या रूग्णालयातील किती डॉक्टरांना बाधा

मुंबईतील पालिका तसेच सरकारी रुग्णालयातील तब्बल २६५ निवासी डॉक्टर कोरोनाबाधित आहे. मुंबईतील जेजे सरकारी रुग्णालयांत ७३, पालिकेच्या केईएम रुग्णालयात ६०, सायन रुग्णालयात ८०, नायर रुग्णालयांत ४५ तर कूपर रुग्णालयांत ७ निवासी डॉक्टरांवर कोरोनासाठी उपचार सुरु आहेत. मुंबईबाहेरील ठाणे कळवा शासकीय रुग्णालयात ७, धुळे शासकीय रुग्णालयांत ८, नागपूर आयजीएम रुग्णालयांत, औरंगाबाद शासकीय रुग्णालयांत तसेच लातूर शासकीय रुग्णालयांत प्रत्येकी एका निवासी डॉक्टराला कोरोना झाला आहे.  पुण्यातील बीजे वैद्यकीय रुग्णालयांत ५, मिरज सरकारी रुग्णालयांत २ निवासी डॉक्टरांवर उपचार सुरु केले आहेत. परंतु या रुग्णांना घरीच विलगीकरण देण्यात आले आहे.

(हेही वाचा – कोरोनावर उपचार करणारेच ‘कोरोना’च्या विळख्यात…)

‘सरकारने त्वरित रिक्त पदे भरावीत’

राज्यभरांतील निवासी डॉक्टरांमध्ये आता कोरोनाची लागण होत आहे. सरकारने त्वरित रिक्त पदे भरावीत, असे निवासी डॉक्टरांची संघटना आणि महाराष्ट्र असोसिएशन फॉर रेसिडेंट डॉक्टर (मार्ड) चे अध्यक्ष डॉ. अविनाश माधव दहिफळे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here