भयंकर! पुण्यात चक्क रस्त्यावरच केले अंत्यसंस्कार

पुणे शहरालगत असलेल्या सिंहगड किल्ले परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संततधार पावसामुळे आतकरवाडी गावात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली.

काय घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार सिंहगडाच्या पायथ्याशी आतकरवाडी नावाचे गाव आहे. पुणे शहरापासून अगदी ३० ते ३५ किमी अंतरावर असलेले हे गाव. या गावात स्मशानभूमी नाही. त्यात मुसळधार पाऊस सुरू होता. वाहणारे पाणी ओसरण्यसाठी नागरिकांना तब्बल तीन तासाहून अधिक वेळ अंत्यविधी करण्यासाठी ताटकळत थांबावे लागले. पाऊस थांबत नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी चक्क रस्त्यावरच अंत्यविधी केले. या भयंकर घटनेनंतर पुणे शहरापासून जवळ हे गाव असूनही अशी वेळ आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – सायबर क्राईमविरोधात Online तक्रार करायची आहे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स)

राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा भंडाफोड झाल्याचे पहायला मिळाले. पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या गावातले हे वास्तव चित्र राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणारे आहे. तसेच सिंहगड परिसरामध्ये आठ ते दहा अशी लहान मोठी गावे असून बहुतांश गावात अद्यापही स्मशानभूमीची सोय नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here