टाइम्स हेल्थ केअर लीडर 2024 पुरस्कार Fortis च्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. नाबर यांना प्रदान

या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम 16 डिसेंबरला मुंबई येथे पार पडला.

35

टाइम्स ग्रुपच्या वतीने देण्यात येणार ‘टाइम्स हेल्थ केअर लीडर 2024’ हा पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात मानाचा पुरस्कार समजला जातो. या व्यासपीठावरून आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारी रुग्णालये, क्लिनिक आणि डॉक्टर यांचा हा पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा सन्मान केला जातो. या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम 16 डिसेंबरला मुंबई येथे पार पडला. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर यांच्या हस्ते हे पुरस्कार मान्यवरांना प्रदान करण्यात आले.

(हेही वाचा Cyber Crime: सावधान! सायबर गुन्हेगार करत आहेत सरकारी विभागांना लक्ष्य; पाच वर्षांतील टक्केवारी आली समोर)

यावेळी मुंबई Fortis च्या अतिदक्षता विभागाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महामुंबईत Fortis ची एकूण चार रुग्णालये आहेत, त्यातील मुंबईतील माहिम भागातील Fortis च्या अतिदक्षता विभागाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार या विभागाचे प्रमुख डॉ. अमित नाबर यांनी स्वीकारला. यावेळी त्यांचे सहकारीही उपस्थित होते. या कार्यक्रमात एच.एन. रिलायन्स रुग्णालय, एसीआय कम्बाला रुग्णायल, एस एल रहेजा रुग्णालय, क्रिटीकेअर एशिया रुग्णालय आदी रुग्णालयांना पुरस्कार देण्यात आले. समर्पित भावाने होणारी वैद्यकीय सेवा ही मानवी जीवनमूल्यांचा एक महत्वाचा भाग असतो. या जीवनमूल्याची जपणूक करणारे वैद्यकीय क्षेत्रात अधिकाधिक डॉक्टर निर्माण व्हावे, त्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन मिळावे याकरता हा पुरस्कार फायदेशीर ठरतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.