मुंबईतील महिला प्रवाशांची ‘सुरक्षा’ होणार अधिक ‘BEST’!

126

मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. या मुंबईत लाखो महिला-पुरूष एकत्र नोकरी करताना दिसतात. यावेळी या महिला मुंबईल लोकलसह बेस्ट बसने प्रवास करत असतात. आता बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याचे सांगितले जात आहे. महिला प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) च्या अॅप-आधारित बस सेवेमध्ये महिला प्रवासी त्यांच्या निवासस्थानी सुरक्षितपणे पोहोचतील याची खात्री करण्यासाठी ‘होम रीच’ हे अतिरिक्त फीचर जोडले जाणार आहे.

(हेही वाचा – Paytm वरून Mobile Recharge करताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची)

कोणत्या प्रवाशांसाठी उपलब्ध असणार हे फीचर 

बेस्ट प्रीमियम/लक्झरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी हे फीचर उपलब्ध असणार आहे. महिला प्रवाशांना अॅपमध्ये त्यांच्या घराचा पत्ता आणि आपत्कालीन संपर्क क्रमांकासह माहिती द्यावी लागेल. या व्यतिरिक्त ते लाइव्ह लोकेशनचा पर्यायही येथे निवडू शकतात. प्रवाशांनी असे केल्यास ते सुरक्षितपणे घरी पोहोचले की नाही याची खात्री बेस्ट नियंत्रण कक्षाला कळू शकते. तसेच त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यास देखील मदत होऊ शकते.

(हेही वाचा – Amazon वरून शूज खरेदी करताय? मग आधी ते पायात घालून तर बघा, काय आहे भन्नाट फीचर?)

कोणासाठी हे फीचर ठरणार उपयुक्त

महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे एक उपयुक्त फीचर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. बेस्टकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर महिला प्रवासी त्यांच्या निर्धारित वेळेत त्यांच्या गंतव्यस्थानी म्हणजेच ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाहीत, तर बेस्ट नियंत्रण कक्ष प्रवाशांना काही समस्या आहे का हे जाणून घेण्यासाठी किंवा तपासण्यासाठी कॉल करणार आहे. जर प्रवासी या कॉलला प्रतिसाद देऊ शकत नसतील तर, त्यांच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर नियंत्रण कक्षाद्वारे संपर्क साधला जाईल.

मुंबईत 100 लक्झरी बसेस दाखल होणार

असे सांगितले जात आहे की, सुरुवातीला, BEST 30 प्रीमियम बसेससाठी हे फीचर लाँच कऱणार आहे. यावेळी ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांचा विचार केला जाणार असून हे फीचर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि दक्षिण मुंबईसह व्यावसायिक जिल्ह्यांच्या ठिकाणी चालवले जाणार आहे. तर या प्रिमियम बसेसचे भाडे नियमित बसेसपेक्षा जास्त असणार आहे. 2022 च्या अखेरीस मुंबईत 100 लक्झरी बसेस दाखल होण्याची अपेक्षा देखील प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.