ओपरा विन्फ्रे एक अमेरिकन मीडिया उद्योजक, टॉक शो होस्ट, अभिनेत्री, निर्माता आणि पटकथा लेखक आहे. The Oprah Winfrey Show या कार्यक्रमामुळे तिला प्रचंड प्रसिद्धी लाभली. त्यासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम तिने दीर्घकाळ चालवून दाखवला. १९८६ ते २०११ अशी सलग २५ वर्षे शो होस्ट करण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वात अधिक पाहिल्या गेलेल्या कार्यक्रमांपैकी एक आहे. (Oprah Winfrey)
Oprah Winfrey चा जन्म २९ जानेवारी १९५४ रोजी मिसिसिप्पी येथे झाला. तिचं कुटुंब गरीब आणि अगदी सामान्य होतं. लहानपणी तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. ती नऊ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला होता आणि ती चौदा वर्षांची असताना गरोदर झाली होती. पण गर्भातच तिच्या बाळाचा मृत्यू झाला. इतक्या वेदना सोसूनही ती डगमगली नाही. तर पुन्हा उभी राहिली.(Oprah Winfrey)
(हेही वाचा : Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे खासदार जलील यांना प्रत्युत्तर; तुमचा ‘जिगर का तुकडा’ पाकिस्तानला पळाला)
सुरुवातीला तिने रेडिओत काम केले. शिक्षण घेत असताना १९ व्या वर्षी बातम्यांसाठी सह-निवेदिका झाली. तिचं सहज, सुंदर बोलणं, तिचे भावनाप्रधान शब्द लोकांना आकर्षित करु लागले आणि पाहता पाहता ती क्रमांक एकची होस्ट झाली. ओपराचे वैशिष्ट्य म्हणजे तिने २० व्या शतकातील अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आफ्रिकन-अमेरिकन लेखिका होण्याचा मान मिळवला आहे. त्याहीपेक्षा मोठी बाब म्हणजे एकेकाळी ती जगातील एकमेव कृष्णवर्णीय अब्जाधीश होती. काही तज्ञांच्या मते, ती जगातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community