International Mountain Day : पर्वत संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता करणे गरजेचे आहे – के. सरस्वती

भारतातच नव्हे तर जगभरातील १५ टक्के लोकसंख्या ही पर्वतीय प्रदेशात राहतात. आणि आपण याचे रक्षण केले पाहिजे असे आवाहन माऊंटेनरिंग फॉउंडेशन च्या अध्यक्षा के सरस्वती यांनी केले.

347
International Mountain Day : पर्वत संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता करणे गरजेचे आहे - के. सरस्वती
International Mountain Day : पर्वत संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता करणे गरजेचे आहे - के. सरस्वती

पर्वताच्या संवर्धनासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी आपण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच हे पर्वतीय देश हे निसर्ग संपन्नतेने नटलेले आहे. भारतातच नव्हे तर जगभरातील १५ टक्के लोकसंख्या ही पर्वतीय प्रदेशात राहतात. आणि आपण याचे रक्षण केले पाहिजे असे आवाहन माऊंटेनरिंग फॉउंडेशन च्या अध्यक्षा के सरस्वती यांनी केले.  स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (International Mountain Day)
११ डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ (International Mountain Day) म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर स्मारक येथील सभागृहात सोमवारी,(११ डिसेंबर) सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी गिर्यारोहण  (Mountain Climbing)सायकलिंग(Cycling) तसेच वन्यजीवन (Wild Life) या विषयावर जगातील अनेक ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्म (Short Film) प्रेक्षकांना दाखविण्यात आल्या.

(हेही वाचा :  Article 370 : जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्याव्यात; काय म्हणाले न्यायालय)

यामध्ये एखादे ध्येय साध्य करताना येणाऱ्या अडचणी तसेच संकटे कशी सहजपणे निभावून नेली याची अगदी थरारक दृश्य दाखविण्यात आली होती. याशिवाय एक हात नसताना तसेच डोळ्यांना दिसत नसताना काही सायकलवीरांनी मनाली ते लेह हे काही मैलांचे अंतर कसे चिकाटीने पार केले ही दृश म्हणजे अंगावर काटा आणणारी होती. तसेच डोंगराळ भागातील  वन्यप्राणी आणि तेथील वनस्पतींचा अभ्यास करणारी शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. ज्यामध्ये अरुणाचल प्रदेशातील पांडा या वन्यप्राण्याच्या  जीवनशैलीवर अभ्यास करणारी एक सुंदर अशी शॉर्ट फिल्मही दाखविण्यात आली. तर हा दिवस देशातील विविध राज्यात साजरा केला जातो आणि लोकांमध्ये पर्वत तसेच नद्या यांचे संवर्धन आपण सर्वांनीच करणे गरजेचे आहे आणि इतरांमध्येही जागृती करणे गरजेचे असल्याचेही कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना  के. सरस्वती यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.