‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी मुळावर घाव घाला!

140

अलिकडच्या काळात ‘लव्ह जिहाद’ वाळवीसारखा पसरू लागला आहे. याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जात नसल्याने भविष्यात विपरित परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येक व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्य असले तरी कोणी आपल्याला नियोजनपूर्वक जाळ्यात अडकवत नाही ना, याकडेही डोळसपणे पाहण्याची गरज आहे. विशेषतः तरुणींनी यासंदर्भात खबरदारी घेण्याची गरज आहे.

आमच्याकडे सुरुवातीला मतदारसंघातील आदिवासी भाग आणि अमरावतीमधून लव्ह जिहाद संबंधीच्या तक्रारी आल्या. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर औरंगाबाद, पुण्यासह राज्यभरातून संपर्क साधला जात आहे. अमरावतीत परवा जी घटना घडली, त्या पीडितेला आम्ही व्हिडिओ कॉल केल्यानंतर सत्यपरिस्थिती उजेडात आली. त्यानंतर तिच्या भावाने पोलिसांच्या मदतीने तिची सुटका केली. कोणी स्वतःच्या मर्जीने त्यादिशेने वळले असेल, तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. पण अशी प्रकरणे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी असतील. अधिकतर प्रकरणांमध्ये तरुणींना जाणीवपूर्वक, फसवणूक करून जाळ्यात ओढले जात आहे. यामागे मोठी साखळी कार्यरत आहे. ती तोडण्यासाठी आमची धडपड सुरू आहे.

…तर लव्ह जिहादची प्रकरणे थांबवता येतील

लव्ह जिहादसाठी ठरवण्यात आलेले रेटकार्ड पाहून मनाला अत्यंत दुःख होते. अमूक समाजासाठी ५ लाख, तमूक समाजातील मुलींसाठी १० लाख असा बाजार या लोकांनी मांडला आहे. मग तरुणींच्या भावनांशी खेळून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्यांविरोधात आम्ही आवाज उठवणे, हा गुन्हा आहे का? लव्ह जिहाद रोखण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना काम करीत आहेत. त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींची साथ मिळाल्यास किमान त्या-त्या क्षेत्रात तरी लव्ह जिहादसारखी प्रकरणे वेळीच थांबवता येतील.

( हेही वाचा: ठाकरे गटाच्या दुस-या राऊतांची जीभ घसरली, शिंदे गटाचा उल्लेख करताना घातली शिवी )

घटनेच्या मुळाशी जाणे गरजेचे

लव्ह जिहादच्या समूळ उच्चाटनासाठी मुळावर घाव घालावा लागेल. त्यात सुरक्षा यंत्रणांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक प्रकरणाची खोलवर चौकशी करून मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मधल्या काळात मेळघाटात असेच एक प्रकरण उघडकीस आले होते. संबंधित पीडितेला व्हिडिओ कॉल केल्यानंतर तिने स्वखुशीने हे केल्याचे सांगितले. परंतु, भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळेच तिने भीतीपोटी ही कबुली दिल्याचे कालांतराने उघड झाले. त्यामुळे तक्रारीनंतर तिच्या मुळाशी जाणे, पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवणे आवश्यक आहे. तरच खरे-खोटे बाहेर येईल.

(लेखिका खासदार आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.