Tom Alter : राजेश खन्नामुळे ‘हा’ झाला अभिनेता; जीवन प्रवास जाणून घ्या

206
Tom Alter : राजेश खन्नामुळे 'हा' झाला अभिनेता; जीवन प्रवास जाणून घ्या
Tom Alter : राजेश खन्नामुळे 'हा' झाला अभिनेता; जीवन प्रवास जाणून घ्या

टॉम ऑल्टर (Tom Alter) हे एक अमेरिकन वंशाचे भारतीय अभिनेते होते. ते आपल्या चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजनच्या कार्यक्रमांत केलेल्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत. २००८ साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. (Tom Alter)

(हेही वाचा- NIA: दाऊद टोळीच्या आरिफ भाईजानचा जे.जे. रुग्णालयात मृत्यू , तुरुंगातच आला हार्ड अॅटॅक; वाचा पुढे काय झालं…)

टॉम ऑल्टर (Tom Alter) यांचा जन्म २२ जून १९५० साली उत्तरखंडातल्या मसुरी येथे झाला. त्यांचे वडील अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशनरी होते. त्यांचे आजी आजोबा अमेरिकेतून १९१६ साली भारतात मद्रास येथे राहायला आले. त्यानंतर ते फाळणीपूर्वी लाहोर येथे स्थायिक झाले. टॉम ऑल्टर (Tom Alter) यांच्या वडिलांचा जन्म सियालकोट येथे झाला.

भारताची फाळणी झाल्यानंतर टॉम ऑल्टर (Tom Alter) यांच्या कुटुंबाचे दोन भाग झाले. कारण त्यांचे आजोबा-आजी हे पाकिस्थानातच राहिले आणि त्यांचे आई-वडील हे भारतात आले. सुरुवातीला ते अलाहाबाद, जबलपूर आणि सहारनपूर या ठिकाणी राहिले, मग पुढे ते १९५४ साली उत्तरखंडातल्या राजापूर येथे स्थायिक झाले. राजापूर हे देहराडून आणि मसुरीमधले एक छोटे शहर आहे. (Tom Alter)

(हेही वाचा- Anti Paper Leak Act: देशात पेपरफुटीविरोधी नवा कायदा लागू, नियम काय आहेत? जाणून घ्या…)

टॉम ऑल्टर (Tom Alter) यांनी इतर भाषांसोबतच हिंदी भाषेचाही छान अभ्यास केला होता. कधीकधी त्यांना लोक ‘अस्खलित हिंदी बोलणारा निळ्या डोळ्यांचा साहेब’ असं म्हणायचे. त्यांचं शालेय शिक्षण मसुरीच्या वुडस्टॉक स्कुल येथे झालं. वयाच्या अठराव्या वर्षी ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तिथे त्यांनी येल विद्यापीठात एक वर्ष शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांच्या अभ्यासातला रस कमी व्हायला लागला आणि ते भारतात परत आले. (Tom Alter)

त्यांनी हरियाणातल्या सेंट थॉमस स्कुलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. सहा महिने ते त्या शाळेत शिकवत होते. अभ्यासाबरोबरच ते आपल्या विद्यार्थ्यांना क्रिकेटही शिकवायचे. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. सेंट थॉमस स्कुलमध्ये शिकवत असताना त्यांनी राजेश खन्ना मुख्य भूमिकेत असलेला ‘आराधना’ चित्रपट पाहिला. त्याचवेळी त्यांचे विचार आणि आयुष्य पार पालटून गेले. (Tom Alter)

(हेही वाचा- Thane: ठाण्यातील फुटबॉल मैदानावर लोखंडी शेड कोसळला, ८ मुले जखमी; ३ गंभीर अवस्थेत)

अभिनेता राजेश खन्नामुळे (Rajesh Khanna) ते खूप प्रभावित झाले. त्यावेळी त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पुण्यातल्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ म्हणजेच FTII मध्ये ऍडमिशन घेतलं. तिथे त्यांनी रोशन तनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली १९७२ ते १९७४ सालापर्यंत पर्यंत अभिनयाचा मनापासून अभ्यास केला. मग त्यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांत काम करून लोकांची मनं जिंकून घेतली. (Tom Alter)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.