तुम्ही विमान सेवेने प्रवास करत असाल विशेषतः स्पाईसजेटनचे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण आता स्पाईसजेटच्या फ्लाइटमध्ये तुम्हाला लवकरच इंटरनेट सेवा सुरू होणार आहे.
लवकरच ब्रॉडबँड इंटरनेट सेवा होणार सुरू
सीएमडीच्या मते, ब्रॉडबँड इंटरनेट सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता असून येत्या काही महिन्यांत स्पाईसजेट आणखी बोईंग 737 मॅक्स विमाने दाखल करणार आहे. त्यामुळे लवकरच स्पाईसजेटच्या विमानांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू होईल अशी अपेक्षा आहे. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अजय सिंह यांनी सोमवारी ही माहिती दिली.
(हेही वाचा – आसाममध्ये पुराचा कहर, 7 लाखांहून अधिकांना फटका)
येत्या काही महिन्यांत आणखी उड्डाण होणार
एअरलाइन्सकडे 91 विमानांचा ताफा आहे, त्यापैकी 13 मॅक्स विमाने आहेत आणि 46 बोईंग 737 विमानांची जुनी एडिशन आहेत. स्पाइसजेटच्या अधिकृत वेबसाइटनुसार ही माहिती मिळाली आहे. एअरलाइनच्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त कर्मचार्यांना केलेल्या ईमेलमध्ये सिंग यांनी असे सांगितले की, काही विमानं दर महिन्याला सर्वाधिक लोडसह उड्डाण करत आहे आणि येत्या काही महिन्यांत आणखी उड्डाण करण्याची अपेक्षा आहे.
Join Our WhatsApp Community