वाचकहो, तुम्हाला गव्हर्नमेंट इंटर्नशिप (Government Internships) बद्दल माहिती आहे का? बरं, इंटर्नशिप म्हणजे काय असतं हे माहिती आहे का? चला तर आज आम्ही तुम्हाला या Government Internships माहिती देणार आहोत आणि त्याचे लाभही सांगणार आहोत.
थोडक्यात इंटर्नशिप म्हणजे कॉलेजमध्ये शिकवलेले धडे आणि प्रत्यक्षात नोकरी करताना मिळत असलेला अनुभव यामधील पूल… हे सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांच्यातील विशेष संबंध दर्शवते. खरंतर इंटर्नशिप म्हणजे छोटा पॅकेट बड़ा धमाका आहे. कामाच्या वातावरणातील मूलभूत नीतिशास्त्र शिकण्यापासून ते कंपनीमध्ये योगदान कसे द्यावे, सर्व कौशल्ये इंटर्नशिपमध्ये शिकवली जातात.
(हेही वाचा – 164 Cr. Extortion case : ईडीची भीती दाखवून १६४ कोटींची खंडणी मागितली, ६ जणांना अटक)
म्हणजेच इंटर्नशिपद्वारे तुम्ही स्वतःची पारख करु शकता. तुम्हाल प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाल्यामुळे तुम्ही जेव्हा खर्या अर्थाने नोकरीवर रुजू होता तेव्हा तुम्ही एक मच्युअर्ड कर्मचारी बनता. त्यामुळे भविष्यात येणार्या आव्हानांना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता.
गव्हर्नमेंट इंटर्नशिप (सरकारी इंटर्नशिप)
निती आयोग इंटर्नशिप (Niti Aayog Internship)
नॅशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याद्वारे NITI आयोगाअंतर्गत इंटर्नशिप योजनेअंतर्गत यूजी, पीजी आणि भारतातील आणि परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या संशोधन विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रदान करते.
अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या: niti.gov.in.
लोकसभा
संसदेचे (Lok Sabha) कनिष्ठ सभागृह विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे इंटर्नशिप प्रदान करते. याद्वारे विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचा इंटर्नशिप प्रोग्राम प्रदान केला जातो. पीजी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसेच पुढे विज्ञान, सामाजिक विज्ञान यासह कोणत्याही शाखेतील यूजी, किंवा पीजी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी एक महिन्याच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी देखील प्रदान केली जाते.
अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या: loksabha.nic.in
(हेही वाचा – BMC Budget 2024-25 Best: बेस्टला ९२८ कोटी रुपयांचे अनुदान)
महिला आणि बाल विकास मंत्रालय
महिला आणि बाल विकास मंत्रालय (Ministry of Women and Child Development) तरुण पदवीधर, पदव्युत्तर पदवीधरांना इंटर्नशिप प्रदान करते. महिला सक्षमीकरण आणि बालकांशी संबंधित योजनांच्या संदर्भात मंत्रालयात सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामात उमेदवारांना मदत करणे हा इंटर्नशिपचा मुख्य उद्देश आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या: wcd.nic.in
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र
जनसंवाद किंवा पत्रकारिता या विषयात पदवीधर असलेले आणि जे उमेदवार १२ महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध होतील, अशांना इंटर्नशिप दिली जाते. (Nashik Municipal Smart City Development Corporation)
अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या: internship.aicte-india.org
गव्हर्नमेंट इंटर्नशिपचे ५ मुख्य फायदे
अनुभवसंपन्न
तुम्ही इंटर्नशिपसाठी जेव्हा अर्ज करता तेव्हाच तुम्ही तुमच्या अनुभवाला सुरुवात करत असता. कॉलेजचे आयुष्य संपून प्रत्यक्ष आयुष्यात लढायला सज्ज होता. जेव्हा तुमची इंटर्नशिप पूर्ण करता तेव्हा सैद्धांतिक ज्ञानासह तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव मिळतो. म्हणजेच तुम्ही अनुभवसंपन्न होता.
ऑनसाइट काम करण्याचा अनुभव
लक्षात घ्या मित्रांनो, कॉलेमध्ये थियरी शिकणे आणि प्रत्यक्षात साइटवर जाऊन काम करणे, यात जमीन अस्मानाचा अंतर आहे. कॉलेजमध्ये तुमचे तास ठरलेले असतात. मात्र ऑनसाइट तुम्हाला कधीच कळत नाही की कोणत्या नवीन समस्या कुठून येत आहेत. नोकरीला सुरुवात करताना त्रास होतो. म्हणून इंटर्नशिप केल्यामुळे मिळालेल्या ऑनसाइट अनुभवाचा लाभ होतो.
(हेही वाचा – Bmc budget 2024 -25 education: महापालिका शिक्षण विभागासाठी यंदा केवळ १५० कोटींचाच अधिक निधी)
तुमचे नेटवर्क निर्माण होते
कोणत्याही कामामध्ये कॉंटॅक्ट्स महत्वाचे असतात. एखादा प्रोजेक्ट आला तर कॉंटॅक्ट्स लागतात, त्याचबरोबर प्रोजेक्ट्स मिळवायला देखील कॉंटॅक्ट्स लागतात. हे कॉंटॅक्ट्सचं नेटवर्क तुम्ही इंटर्नशिपमध्ये निर्माण करु शकता. विचार करा, तुम्ही जेव्हा नोकरीला लागाल तेव्हा तुमचे स्वतःचे नेटवर्क निर्माण झालेले असेल. कारण तुम्ही ६ महिने ते १२ महिने इंटर्नशिपमध्ये काम केलेले असते.
व्यावहारिक ज्ञान
शिक्षण घेतल्यानंतर पुस्तकी ज्ञान बाजूला राहतं आणि व्यवहारात मात्र वेगळंच घडतं. त्यामुळे व्यावहारिक ज्ञान म्हणजेच प्रॅक्टिकल नॉलेज असणे अत्यंत आवश्यक आहे. इंटर्नशिपमध्ये चुका करून त्यात सुधारणा करून खूप काही शिकायला मिळते. कर्मचाऱ्यांचा दैनंदिन संवाद, मिळवण्याचे प्रकल्प आणि असी साधने जी तुम्हाला उपयुक्त ठरतील इत्यादी गोष्टी नोकरीवर रुजू होण्याआधीच शिकल्यामुळे तुमचं व्यावहारिक ज्ञान पक्क होतं.
जगाकडे पाहण्याची दृष्टी
आधी घर, मग शाळा आणि नंतर कॉलेज अशा वातावरणात राहिल्यामुळे आणि लहानपणापासून आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे आपला एक विशिष्ट दृष्टीकोन आणि समज निर्माण झालेला असतो. जगाकडे कदाचित आपण संकुचित नजरेने पाहत असू. मात्र कामाचा अनुभव मिळाल्याने आणि विविध लोकांसोबत बैठका वगैरे केल्यामुळे जग किती वेगळं आहे याचा प्रत्यय आपल्याला येतो आणि जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी अत्यंत प्रॅक्टिकल आणि सकारात्मक होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community