असे म्हणतात की, हसणे हा सर्व समस्यांवरील उपाय आहे. आता सोशल मीडियामुळे मनोरंजनाची बरीच साधने निर्माण झाली आहेत. त्यामुळे वेळ कसा घालवावा, हा प्रश्न नसतो. एकेकाळी कुठेतरी ऐकलेले विनोद एकमेकांना ऐकवून हसवणे, हा एक फार मोठा विरंगुळा होता. राम गणेश गडकरी यांचे ‘संपूर्ण बाळकराम’, पु.ल. देशपांडे यांचे ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘दुदाम्याचे पोहे’ यांचे लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर अशी विनोदी लिखाणाची यादीच आपल्या डोळ्यांसमोर येते. या सर्व लेखकांच्या लेखनातून विविध प्रकरचा विनोद व्यक्त होतो. मात्र त्यामागील हेतू हाच की माणसाला त्याच्या आयुष्यातील चार क्षण का होईना पण ते विरंगुळ्याचे मिळावेत. असेच थोडे हलके-फुलके विनोद… (Marathi Jokes)
(हेही वाचा – सतारवादनामध्ये वेगवेगळ्या शैली निर्माण करणारे महान सतार वादक Ravi Shankar)
-
कागदावरचे वजन
कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही – न्युटन
पण सरकारी कागदावर वजन ठेवले, तरच तो वेगाने हालतो – सरकारी न्युटन
-
पैशाचा लाड
मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..
मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
मुलगा :आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मजा करा..पण पैशाचा लाड नाही करायचा…!
-
इंद्रजित बोलतोय
नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो.
आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.
नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.
आजी : इंग्रजीत नको बाबा मराठीतच बोल
- आयफोनची किंमत
गिऱ्हाईक: आयफोन 10 किती रुपयांना आहे?
सेल्सगर्ल: 150000/-रूपयांना आहे. तूम्ही पैसे कसे देणार कार्ङने देता का रोख देता?
गिऱ्हाईक: किङन्या स्वीकारता का तूम्ही?
- पगारवाढ
बॉस : अभिनंदन, तुमची निवड झाली आहे. तुमचा पगार पहिल्या वर्षी 6 लाख असेल आणि पुढच्या वर्षी 10 लाखांपर्यंत वाढवला जाईल.
राजन बॅग उचलून निघू लागला.
बॉस : अरे काय झालं, कुठे चालला आहेस?
राजन : आता पुढच्या वर्षीच येईन ! (Marathi Jokes)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community