राज्यात दोन दिवसांत ओमायक्रॉनबाधित नवे ११ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात आता ६५ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तपासणीतून रुग्णांची संख्या वाढत असून तब्बल ८ रुग्ण ओमायक्रॉनबाधित असल्याचे जनुकीय चाचणीच्या अहवालातून समोर आले. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान परिषदेने या आठ रुग्णांसह नवी मुंबई आणि उस्मानादमध्येही प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाल्याचे स्पष्ट केले. मुंबई आठ रुग्णांपैकी दोन रुग्ण अठरावर्षांखालील आहे. उस्मानाबादमधील १३ वर्षांची रुग्ण मिळून तीन लहान मुलांना ओमायक्रॉनच्या बाधा झाल्याचे मंगळवारी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
सोमवारी ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळून आला नव्हता. उपचाराअंती केवळ तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले. मंगळवारीही राज्यातील विविध भागांत ओमायक्रॉनवर यशस्वी उपचार केल्यानंतर अजून तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ६५वर पोहोचली असली तरीही ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या केवळ ३१ रुग्णांवर ओमायक्रॉनसाठी उपचार दिले जात आहेत.
(हेही वाचा- ‘या’ जिल्ह्यात कोरोना लस घेतली असेल तरच मिळणार पेट्रोल!)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आढळलेल्या नव्या ८ रुग्णांबद्दल
- ८ रुग्णांपैकी ५ रुग्ण मुंबईतील रहिवासी आहे. उर्वरित ठाणे व गुजरात आणि केरळ राज्यातील रुग्ण आहेत
- प्रत्येकी दोन रुग्णाने युंगाडा आणि दुबईतून प्रवास केला आहे. उर्वरित ४ रुग्णांनी इंग्लंडहून प्रवास केला आहे
- १८ वर्षांखालील दोन रुग्णांनी लस घेतलेली नाही
- बहुतांश रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. काहींना सौम्य लक्षणे आहेत
उस्मानाबादमधील १३ वर्षांच्या रुग्णाबद्दल
उस्मानाबादमधील ओमायक्रॉनबाधित रुग्णाच्या १३ वर्षाच्या मुलीच्या जनुकीय चाचणीतून तिलाही बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तिला कोणतीही लक्षणे नाहीत
नवी मुंबईतील रुग्णाबद्दल
केनियावरुन हैदराबाद मार्गे आलेल्या नवी मुंबईतील १९ वर्षीय रुग्णाला ओमायक्रॉन झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाचे लसीकरण पूर्ण झाले असून, तो लक्षणेविरहीत आहे.
Join Our WhatsApp Community