देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनची धास्ती दिवसेंदिवस वाढत आहे. देशात सध्या २३६ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाला असून यापैकी १०४ जणांनी त्यावर मात केली आहे. दरम्यान, देशातील एकूण १६ राज्यांत ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. देशातील ओमायक्रॉन रूग्णांमध्ये होणारी वाढ ही चिंतेची बाब होत चालली आहे. अशा परिस्थितीत तामिळनाडूमधून धक्कादायक बाब समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये ओमायक्रॉनचे एकाच वेळी तब्बल ३३ नवे रूग्ण आढळून आले आहेत.
(हेही वाचा – शिवसेनेचे हिंदुत्व भेंडी बाजारातील! नितेश राणेंचा घणाघात)
Total cases of #Omicron variant in Tamil Nadu rises to
34: State Health Minister Ma Subramanian(File photo) pic.twitter.com/015HnA0bvq
— ANI (@ANI) December 23, 2021
अहवाल आल्यानंतर ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे उघड
तामिळनाडूमध्ये ओमायक्रॉनचा विस्फोट झाल्याने राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री एम सुब्रमण्यम यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णाची संख्या ३४ झाली आहे. यापूर्वी केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीत तामिळनाडूनत फक्त १ रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता. गुरूवारी तामिळनाडूत ओमायक्रॉनच्या ३३ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली. कोरोनाची लागण झालेल्या या सर्व रूग्णांवर सध्या उपचार सुरू असून त्यांचे रूग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल आल्यानंतर या सर्वांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये २९ विद्यार्थ्यांना लागण
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत चेन्नईत २६, सलेममध्ये १, मदुराईत ४ आणि तिरुवनमलाईमध्ये २ असे एकूण ३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २८७ वर गेली आहे. एकीकडे तामिळनाडूत ३३ रूग्ण आढळल्यानंतर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील शाळेत कोरोनाचा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. या ठिकाणी एका शाळेतील २९ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ९ वी आणि १० वी च्या एकूण २९ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community