उंदीर मामांनी पळवून लावलेल्या अधिकाऱ्यांना अखेर वनाधिकाऱ्यांनी दिला बंगला

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आदिवासी तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या आयआयटीएम आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अखेरीस गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता वनाधिकाऱ्यांनी निवासासाठी बंगला दिला. सोमवारपासून आमदार प्रवीण दरेकर यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या उद्यानात आयआयटीएम आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी वास्तव्यास आहेत. परंतु राहण्याची गैरसोय होत थेट उंदीर मामांनी तीन दिवस सामान कुरतडल्याने बुधवारी सायंकाळी तातडीने त्यांनी उद्यान सोडले होते. याबाबतची बातमी प्रसिद्ध होताच तातडीने वनाधिकाऱ्यांनी त्यांना बंगला दिला.

( हेही वाचा : काँग्रेसच्या खांद्यावर राहूलचे ओझे अन सर्वांच्या खांद्यावर काँग्रेसचे ओझे…)

उद्यान प्रशासनाविरोधात आयआयटीएमचे अधिकारी केंद्रीय तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार नोंदवणार केली. उद्यान सोडून अधिकाऱ्यांनी बुधवारची रात्र बाहेर हॉटेलमध्ये काढली होती. कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी अधिकारी उद्यानात परतले. सकाळीही उद्यानात निवास करायला बंगला मिळेल का अशी विचारणा करताच नकार कळवला गेला. अखेर दुपारी हिंदुस्थान पोस्टने याबाबतची बातमी प्रसिद्ध करताच वनाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना बंगला उपलब्ध करून दिला. मात्र यावेळी कोणताही वनाधिकारी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आला नाही. त्यामुळे प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा उद्यान प्रशासनाविरोधात रोष कायम आहे. याबाबतीत माहिती घेण्यासाठी उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here