-
ऋजुता लुकतुके
हिमाचल प्रदेश हे भारतातील पर्यटकांचं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे. फक्त उन्हाळ्यातच नाही तर थंडीतही तुम्ही इथं खूप सारी धमाल करू शकता. पाहूया हिमाचल प्रदेशमधील आघाडीची १० पर्यटन स्थळं.
हिमाचल प्रदेश म्हणजे बर्फाच्छादित डोंगरांनी वेढलेली आणि खोऱ्यात वसलेली छोटी छोटी गावं, हिमालयातून वाहत येणाऱ्या निळ्याशार पाण्याच्या नद्या, गवतावर येणारी रंगेबेरिंगी फुलं आणि ब्रिटिश काळातली काही जुनी घरं आणि चर्चेस. अशा या हिमाचल प्रदेशाला उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटकांची पहिली पसंती असते.
अलीकडे थंडीतही तिथं ट्रेकिंग तसंच बर्फात खेळण्याचा अनुभव घेण्यासाठी लोक तिथे जातात. दिवाळीच्या सुटीचा हंगाम सुरू आहे. आपणही बघूया हिमाचल प्रदेशमधील दहा आघाडीची पर्यटन स्थळं (Tourist Places in Himachal Pradesh)
१. राजधानी सिमला
सिमला शहराला डोंगर शिखरांची राणी असंही म्हटलं जातं. समुद्रसपाटीपासून २,२०० फूट उंच असलेलं सिमला शहर पुराण काळातील, काली मातेच्या श्यामला या पुनर्जन्म घेतलेल्या देवीचं निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. हिमालय पर्वत रांगांच्या पायथ्याशी हे गाव वसलंय. त्यामुळे चहूकडे हिरवागार निसर्ग आणि त्याचबरोबर बर्फाच्छादित डोंगर असं या शहराचं रुप आहे. थंडीत कधी कधी अख्ख्या शहरावरच बर्फाची चादर पसरते.
आणि पर्यटक अशावेळी आईस-स्केटिंग, स्किइंगचा आनंद लुटतात. शहरातील मॉल रोडही पर्यटकांची आवडती जागा आहे. शिवाय ब्रिटिशकालीन चर्चेस, जुनी देवळं यांनी हे शहर नटलेलं आहे. (Tourist Places in Himachal Pradesh)
२. कुल्लू-मनाली
दोन्ही ठिकाणं जवळ जवळ असल्यामुळे अनेकदा आपण हे नाव एकत्रच घेतो. इतिहास आणि हिमालयन संस्कृती यांचा मिलाफ या शहरांत आपल्याला पाहयला मिळतो. बियास नदीच्या काठावर ही शहरं वसली आहेत. मनाली शहर तर इंग्रजांची शीतकालीन राजधानी होती.
इथे हिमालयन नॅशनल पार्क, सुलतानपूर पॅलेस, बिजली महादेव मंदिर, भिगू तसंच पार्वती खोरं ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत. तर मनालीतही बौद्ध मठही आणि रोहतांग पास तसंच हिडिंबा देवीचं मंदिर अशा ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. (Tourist Places in Himachal Pradesh)
३. धरमशाला
धरमशाला हे आणखी एक डोंगरांनी वेढलेलं शहर आहे. धरमशालापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे मॅकलॉईडगंज. या दोन टोकांमधील स्कायराईड प्रसिद्ध आहे. गोंडोला सारख्या १८ गाड्या एकाच वेळी जा-ये करतात. आणि दर तासाला एक अशी ही राईड आहे. धरमशाला आणि मॅकलॉईडगंज ही खासकरून अध्यात्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहेत. इथं बौद्ध मठ मोठ्या संख्येनं आहेत. दलाई लामा मंदिर आहे आणि लोक शांततेसाठी इथं येतात. (Tourist Places in Himachal Pradesh)
४. डलहौसी
पाईन, देवनार, ओक अशा हिमालयातील वनस्पतींची मोठी वनराजी असलेलं डलहौसी हे शहर तिथल्या चांगल्या हवेसाठीही प्रसिद्ध आहे. अतीथंडही नाही आणि उकाडाही नाही, असं इथलं हवामान पर्यटकांना आवडतं. इथली चामुंडा देवी मंदिर, भुरीसिंग संग्रहालय तसंच सुभाष बाओली ही ठिकाण प्रसिद्ध आहेत. इथल्या व्हिकोरिया काळातील इमारतीही लोकांचं आकर्षणाच्या केंद्रस्थानी असतात. (Tourist Places in Himachal Pradesh)
५. खज्जिअर
आता चंबा खोऱ्यात जाऊया. इथं खज्जिअर हे ठिकाण आङे समुद्रसपाटीपासून ६,६०० फूट उंच. सुंदर आणि नितळ तलाव, प्राचीन देवळं यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक इथं येतात. तसंच तरुण पर्यटकांसाठी खज्जिअर आहे मिनी स्वीत्झर्लंड.
बर्फाच्छादित डोंगरांवर तरुण पर्यटक पॅराग्लायडिंग, झोर्बिंग आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकतात. (Tourist Places in Himachal Pradesh)
६. कसोल
कसोल भागाला लिटिल इस्त्रायल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. कारण, इस्त्रायलमधून निर्वासित झालेले ज्यू फिरत फिरत इथं येऊन विसावले आहेत. त्यांची कसोलमधील वस्ती हे एक पर्यटन स्थळच आहे. कारण, ज्यू संस्कृतीची ओळख ते करून देतं.
शिवाय कसोलमध्ये पार्वती नदी प्रसिद्ध आहे आणि हिमालयात ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी बेसकँप याच शहरात आहे. (Tourist Places in Himachal Pradesh)
७. कसौली
कसौली शहर चंदिगडपासून ६० किलोमीटरवर आहे. १८५३ साली ब्रिटिशांनी हे शहर वसवलं. नवी दिल्ली तसंच पंजाबमधून जवळ असल्यामुळे या थंड हवेच्या ठिकाणाचा विकासही लगेच झाला. पाईन आणि देवदार वृक्षांनी नटलेली वनराई आणि गॉथिक प्रकारची जुनी चर्चेस हे इथलं वैशिष्ट्य आहे.
इथली चांगली हवा, मुख्य शहरांशी जवळीक आणि शहरी सुविधांची उपलब्धता यामुळे हनीमूनसाठी जोडपी या शहराला नेमही पहिली पसंती देतात. त्याचवेळी ॲडव्हेंचर खेळांसाठीही हे शहर प्रसिद्ध आहे. (Tourist Places in Himachal Pradesh)
८. कुफरी
कुफरी शब्दाचा अर्थ आहे हिमालयातील गुहा. कुफरी हे ठिकाण तुलनेनं छोटसं असलं तरी दाट बर्फ असलेलं आणि त्यामुळे ट्रेकिंग तसंच हायकिंगसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या बर्फाच्छादित शिखरांच्या उतारावर पर्यटक स्किइंग आणि टोबोगेनिंगचाही आनंद लुटतात. (Tourist Places in Himachal Pradesh)
(हेही वाचा – Tourist Places in Jammu : जम्मू-काश्मीरची ट्रीप प्लॅन करण्यासाठी वाचा ‘या’ 10 टिप्स)
९. पालमपुर
पालमपूर हे उत्तर भारतातील चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कांगरा चहाचा ब्रँड माहीत असलेल्या लोकांना या शहरात गेल्या गेल्या वासावरून चहाचे मळे लक्षात येतील. चांगला स्वाद आणि वास असलेला इथला चहा जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर हे ठिकाण म्हणजे देशातील पॅराग्लायडिंगचं माहेरघर आहे. इथं ३० मिनिटांची पॅराग्लायडिंगची एक सफर आयोजित करण्यात येते. ती खूपच प्रसिद्ध आहे. (Tourist Places in Himachal Pradesh)
१०. कांगरा
इथल्या गग्गल विमानतळापासून कांगरा १३ किलोमीटर दूर आहे. पांडवांनी आपल्या अज्ञातवासादरम्यान इथं डोंगरात कोरून देवळं उभी केल्याचा लोकांचा विश्वास आहे. इथं असलेल्या अनेक देवळांमुळे या जागेला देवभूमी असंही म्हटलं जातं. पांडवांनी बांधलेली जुनी देवळं पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. (Tourist Places in Himachal Pradesh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community