Toyota Innova Crysta 2.4 G STR : टोयोटाच्या इनोव्हा कारमध्ये होतायत ‘हे’ बदल

टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचं एसटीआर मॉडेल भारतात लाँच होण्याच्या तयारीत आहे. 

5841
Toyota Innova Crysta 2.4 G STR : टोयोटाच्या इनोव्हा कारमध्ये होतायत ‘हे’ बदल
Toyota Innova Crysta 2.4 G STR : टोयोटाच्या इनोव्हा कारमध्ये होतायत ‘हे’ बदल
  • ऋजुता लुकतुके

टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचं एसटीआर मॉडेल भारतात लाँच होण्याच्या तयारीत आहे. (Toyota Innova Crysta 2.4 G STR)

एसयुव्ही असली तरी कार चालवल्याचा आरामदायी अनुभव देणारी भारतातील कार असं टोयोटाच्या इनोव्हा गाडीचं वर्णन केलं जातं. इनोव्हाची क्रिस्टा गाडी आता २.४ जी एसटीआर या नवीन मॉडेलसह भारतीय बाजारात येत आहे. २३९३ लीटर क्षमतेचं इंजिन असलेल्या गाडीत ४ सिलिंडर आणि ४ व्हॉल्व आहेत. पूर्णपणे डिझेलवर चालणाऱ्या या गाडीत मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. (Toyota Innova Crysta 2.4 G STR)

२.४ जी एसटीआर हे मॉडेल लाँच करताना कंपनीने पाच नवीन रंगांत ही गाडी आणली आहे. हे रंग आहेत ॲटिट्यूड ब्लॅक मिका, सिल्व्हर मेटॅलिक, प्लॅटिनम व्हाईट पर्ल, सुपरव्हाईट आणि अवांते गार्डे. गाडीची सर्वोच्च शक्ती १४८ बीएचपी इतकी असेल तर टॉर्क ३४३ एनएम इतका आहे. (Toyota Innova Crysta 2.4 G STR)

(हेही वाचा – Tata Altroz Racer : टाटाची नवीन रेसर कार ‘या’ महिन्यात होणार लाँच )

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वेगमर्यादा प्रणाली 

गाडीला पाच दरवाजे आहेत आणि यात एकावेळी ८ लोक प्रवास करू शकतात. पुढे २, मधल्या रांगेत ३ आणि मागच्या रांगेत ३ अशी रचना आहे. तर गाडीची बूटस्पेस ३०० लीटरची आहे. इंधन क्षमता ५५ लीटरची आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडीत वेगमर्यादेची एक प्रणाली बसवण्यात आली आहे. गाडीचा वेग ताशी ८० किमीपेक्षा जास्त जाईल तेव्हा एक मोठा बिप वाजेल. तर वेग ताशी १२० किमीपेक्षा जास्त गेला तर सतत बिप वाजत राहील. (Toyota Innova Crysta 2.4 G STR)

तर गाडीत तीन एअरबॅग देण्यात आल्या आहेत. यातील दोन पुढे बसलेल्या प्रवाशांसाठी तर एक चालकाचे पाय आणि गुडघ्यांसाठी आहे. या गाडीत डिजिटल डिस्प्ले मात्र नाहीए. त्यामुळे जुन्या पद्धतीचा स्टिरिओ गाडीत देण्यात आला आहे. या गाडीची किंमत १९ लाख रुपयांपासून सुरू होते. (Toyota Innova Crysta 2.4 G STR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.