Ayodhya Ram Mandir : अयोध्या सोहळ्यासाठी मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’ ; व्यापाऱ्यांकडून आयोजन

राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्यासाठी मुंबईमध्ये ७५ ठिकाणी श्रीराम फेऱ्यांचे आयोजन व्यापारी वर्गाने केले आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) यासाठी पुढाकार घेतला आहे

219
Ram Mandir : २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टीची शक्यता
Ram Mandir : २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टीची शक्यता

अयोध्येत येत्या २२ जानेवारीपासून रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबईमध्ये (Mumbai) ७५ ठिकाणी श्रीराम फेऱ्यांचे आयोजन व्यापारी वर्गाने केले आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAT) यासाठी पुढाकार घेतला आहे. (Ayodhya Ram Mandir)

अयोध्येत होणाऱ्या रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभर रामभक्तांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यापाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. याअंतर्गत त्यांनी देशभर राम फेऱ्यांचे आयोजन केले आहे. याबाबत कॅट चे महाराष्ट्र सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी सांगितले की, महामुंबई क्षेत्रातील बाजारपेठांमध्ये ७५ ठिकाणी अशा प्रकारे राम फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबईभरातील साडेतीन ते चार लाख व्यापारी सहभागी होतील. प्रभू श्रीरामांबद्दलचे भजने,गाणी यांच्या गायनासह श्रीरामांच्या फोटोची यात्रा, प्रवचने यांचा त्यात समावेश असेल. (Ayodhya Ram Mandir)

(हेही वाचा : Rs 2000 Currency Notes : ९७.३८ टक्के २००० रुपयाच्या नोटा बँकांकडे परत आल्याची रिझर्व्ह बँकेची माहिती)

‘दुकान दुकान अयोध्या’ अभियानाचे आयोजन
कॅट ने यानिमिताने दुकान दुकान अयोध्या हे अभियानदेखील सुरु केलं आहे. त्यामध्ये प्रत्येक दुकानात रामभक्तिमय वातावरण निर्माण केले जाणार आहे. श्रीराम झेंडा, पताका, स्टिकर, पोस्टर व राम मंदिराचे छायाचित्र दुकानांना भेट दिले जाईल. ते त्यांनी दर्शनी भागात लावावे असे आवाहन करण्यात आले आहे. हे अभियान कॅट कडून मुंबईसह देशभरातील विविध बाजारपेठेत २२ जानेवारीपर्यंत जाणार आहे. सर्व व्यापारी हा दिवस ‘रामराज्य दिन’ म्हणून घोषित केले जाणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.