तुम्ही मोटार सायकल, स्कूटरवरून जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दुचाकी वाहन चालक आणि त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला प्रशासनाकडून हेल्मेट अनिवार्य केले होते. त्यानंतर आता एका नवीन वाहतूक नियमाची चर्चा होताना दिसतेय. या नवीन वाहतूक नियमांनुसार, जरी तुम्ही हेल्मेट घातले असले तरी तुमचे 2000 रुपयांचे चलन कापले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. ही बातमी वाचून तुम्ही देखील विचारात पडला असाल..की हे कसे शक्य आहे. वाचा सविस्तर…
मोटार वाहन कायद्यानुसार, जर तुम्ही मोटारसायकल, स्कूटर चालवताना हेल्मेट घातले आहे पण त्या हेल्मेटचा बेल्ट लावला नसेल तर नियम 194D MVA नुसार तुमचे 1000 रुपयांचे चलन आणि तुम्ही हेल्मेट BIS मार्क शिवाय हेल्मेट घातल्यास तुमचे 1000 रुपयांचे चलन 194D नुसार MVA चलन कापले जाऊ शकते. अशा परिस्थितीत हेल्मेट घातल्यानंतरही नवीन नियम न पाळल्याबद्दल तुमच्या हातात 2000 रुपयांचे चलन पडू शकते. रस्ता सुरक्षा आणि ट्रफिक पोलीस नागरिकांना रहदारी नियमांबद्दल माहिती देऊन जागरूक करण्याच्या उद्देशाने सतर्क करत आहे. जेणेकरून रस्त्यावरील अपघातांनाही आळा बसण्यास मदत होईल.
नाहीतर 20 हजारांहून अधिकचे चलन कापले जाईल
याशिवाय, नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, वाहन ओव्हरलोड केल्यास तुम्हाला 20 हजार रुपयांचा मोठा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय, असे केल्यास 2000 रुपये प्रति टन अतिरिक्त दंडही भरावा लागणार असल्याचे हा नवा नियम सांगतो. याआधीही अनेक हजारांची चलन कापल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
असे तपासा चलनाची स्थिती
https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जाऊन चेक चलन स्टेटस हा पर्याय निवडा. तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय मिळेल. वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि ‘Get Detail’ वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या चलनाची काय स्थिती आहे हे दिसेल.
असे भरा ऑनलाइन ट्रॅफिक चलन
https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चलनाशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा आणि गेट डिटेल्स वर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल ज्यावर चालानचे तपशील दिसतील. तुम्हाला भरायचे असलेले चलन शोधा. चलनासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंटची खात्री करा. यानंतर तुमचे ऑनलाइन चलन भरले आहे.
Join Our WhatsApp Community