सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा

133

सायन पनवेल महामार्गावर ट्रक उलटल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. परिणामी पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ट्रक उलटल्याची माहिती मिळाल्यावर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या ट्रकला हटवण्यात आले असले तरी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबई-ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा या ट्रक अपघातामुळे मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे.

क्षमतेपेक्षा अधिक सामान या ट्रकमध्ये भरण्यात आले होते त्यामुळे हा ट्रक हायवेवर पलटी झाला अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. शनिवारी अनेकजण मुंबईबाहेर जाण्यासाठी निघतात त्यामुळे ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांकडून तातडीने प्रयत्न करण्यात आले.

 

New Project 4 20

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.