मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच-लांब रांगा

124

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शुक्रवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याच्या दिशेकडे येणाऱ्या लेनवर लोणावळ्यात अपघात झाला आहे. या अपघातामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

वाहतूक सुरळीत होण्यास विलंब

हा अपघात झाल्यानंतर अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून त्यामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथ गतीने सुरु झाली असली तरी ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी एक तास लगण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – अटकपूर्व जामीन मंजूर होताच संदीप देशपांडे,धुरी ‘शिवतीर्था’वर!)

घाटात वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

विकेंड असल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांचा ओघ हा कायम सुरूच असतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक हळूहळू वाढू लागल्याने घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील लोणावळयाजवळ स्कॉर्पिओ गाडीला हा अपघात झाला आहे. या अपघातात कोण जखमी किंवा मृत्यू झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.