राज्यभरात वाहतूक विभागाने मागील चार दिवसांत १६.१९ कोटी रुपयांची ई-चलनाची थकबाकी वसूल केली आहे. राज्य महामार्ग सुरक्षा पोलिस विभागाने राज्यातील वाहतूक विभागाशी समन्वय साधून ई-चलनाच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात आलेल्या वाहन चालकांना नोटीस पाठवून त्यांना लोकअदालत समोर उभे करून दंडाची रक्कम वसूल केली आहे.
मागील काही वर्षांपासून थकबाकी
राज्य महामार्ग सुरक्षा गस्त (एचएसपी) विभागाने मागील महिन्यात राज्यातील सर्व वाहतूक विभागांशी समन्वय साधला आणि ई – चलन माध्यमातून वाहन चालकांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या होत्या. ९ ते ११ डिसेंबर रोजी या वाहन चालकांना लोकअदालत समोर उभे करण्यात आले होते. राज्यभरात कोट्यवधी रुपयांच्या दंडाच्या रकमेची थकबाकी १६ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी मागील काही वर्षांपासून होती. लोक अदालतने या थकबाकीदाराना दंडाची रक्कम तात्काळ जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर ९ ते ११ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत १६ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी वाहन चालकाकडून भरण्यात आली आहे.
(हेही वाचा राऊतांसह मलिकांनीही का सोडला पवारांच्या पंतप्रधानपदाचा नाद?)
दंडाची थकबाकी त्यांनी भरली नाही, तर…
ई चलनच्या माध्यमातून राज्यभरात वाहतुकीचे नियम मोडणारे, बेशिस्तपणे वाहने उभी करणे अशावर ई – चलनाद्वारे कारवाई करण्यात आली होती, मात्र वाहन चालक दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करीत होते अशा वाहनचालकांना आम्ही ११ डिसेंबर रोजी लोकअदालत समोर उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. भविष्यातही आम्ही हा उपक्रम सुरू ठेवू. जे वाहनचालक लोकअदालत समोर हजर झाले नाही, अथवा दंडाची थकबाकी त्यांनी भरली नाही त्यांना नियमित न्यायालयासमोर खटला भरावा लागेल आणि त्यांना जास्त दंड भरावा लागेल, असे महामार्ग सुरक्षा गस्त विभागाचे पोलिस निरीक्षक म्हणाले.
Join Our WhatsApp Community