आता Online फसवणुकीचं ‘नो टेन्शन’! सरकार आणतंय मोबाईल कॉलिंगबाबत ‘हा’ नवा नियम

ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. मोबाईल कॉलिंगमुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक करणारे कॉलिंगद्वारे लोकांची ऑनलाईन फसवणूक करत आहेत. मात्र आता याला आळा बसणार आहे. कारण याबाबत सरकार एक मोठे पाऊल उचलणार आहे. सरकार मोबाईल कॉलिंगमध्ये मोठे बदल करणार असून यामुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा बसेल आणि बनावट फोन नंबरही गायब होण्यास मदत होईल.

(हेही वाचा – पुणेकरांनो! बेकायदा बाईक, टॅक्सी विरोधात रिक्षा चालक आक्रमक; पुकारला बेमुदत संप)

सरकार KYC प्रणाली लागू करणार

सरकार आता ट्रायसोबत TRAI एक नवीन प्रणाली तयार करणार आहे. यामध्ये कॉल करणाऱ्याचा फोटो त्याच्या मोबाईल नंबरसह दिसणार आहे. यासाठी सरकार KYC प्रणाली लागू करणार आहे. यासाठी दोन व्यवस्था लागू राहतील एक म्हणजे आधार कार्ड आधारित आणि दुसरे म्हणजे सिम कार्ड आधारित.

आधार कार्ड आधारित

या नवीन प्रणालीनुसार सर्व मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केले जाणार आहे. ही नवी प्रणाली लागू झाल्यानंतर, एखाद्या व्यक्तीने कॉल करताच, मोबाईल नंबरसह नाव देखील दिसेल. आधार कार्डमध्ये जे नाव असेल तेच नाव मोबाईल स्क्रिनवर दिसणार आहे. त्यामुळे फोन नेमका कोणी केला हे समजण्यास मदत होणार आहे.

सिम कार्ड आधारित

नवीन सिम घेताना तुम्हाला कागदपत्रे द्यावी लागतील, त्या आधारे कॉलिंगसोबत लोकांचे फोटो जोडले जाणार आहे. अशा परिस्थितीत, बनावट कॉलिंग ओळखणे सोयिस्कर होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, कॉल येताच तो फोटो देखील दाखवला जाईल, जो फोटो तुम्ही सिम खरेदी करताना क्लिक केला होता.

नेमका कोणता फायदा होणार 

ही नवी प्रणाली कार्यान्वित होताच कॉल रिसिव्हरला कळेल की त्यांना कोण कॉल करत आहे. कॉलर आपली वैयक्तिक माहिती लपवू शकणार नाही आणि फसवणूकीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here