दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ‘ही’ होती ठिकाणे!

192

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर शहरातील मुख्य उड्डाणपूल आणि रेल्वे रूळ होते, अशी धक्कादायक माहिती अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्याच्या तपासात समोर आली आहे. पाकिस्तान स्थित आयएसआय संघटनेच्या आदेशावरून या दहशतवाद्यांना मुंबई तसेच देशातील इतर शहरामध्ये मोठा घातपात घडवून आणायचा होता. यासाठी सहा अतिरेक्यांपैकी दोघांना या प्रकारचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीत उघडकीस आली आहे.

१५ दिवसांचे दिलेले प्रशिक्षण!

अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांपैकी ओसामा हा मूळचा दिल्ली येथे राहणारा असून झिशान हा उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे राहणारा आहे. या दोघांना १५ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले होते, या प्रशिक्षणात त्यांना उड्डाणपूल आणि रेल्वे रुळाबाबत अधिक माहिती देण्यात आलेली होती, त्यांना पाकिस्तानच्या कराची येथे असलेल्या थट्टा कॅम्प या आयएसआयच्या फार्म हाऊसवर आरडीएक्स भरलेली आयइडी स्फोटके, हातबॉम्ब, पिस्तुले, काडतुसे हाताळणे, एके४७ चालवणे, चायनिस  पिस्तुल चालावे, रेकी करतांना कुणाला संशय आल्यास परिस्थिती हाताळणे याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, तसेच आयएसआय या गुप्तचर संघटनेकडून यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा : दहशतवादी कारस्थाने व उपाय)

शस्त्रास्त्र पोहचवण्याची जबाबदारी जान महंमदकडे होती!

अटक करण्यात आलेल्या सहा अतिरेक्यांपैकी जान मोहम्मद उर्फ समीर कालिया हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्या संपर्कात होता, तर त्याने उत्तर प्रदेशातील  मूलचंद लाला याला आपल्या गटात सामील करून घेतले होते, या दोघांवर दारुगोळा, शस्त्रे शहरातील  स्लीपर सेल यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.