१०९ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, वादग्रस्त पोलीस उपायुक्त अकबर पठाण पुन्हा मुंबईत

188

मुंबईसह राज्यभरात पोलीस उपायुक्त दर्जाच्या १०९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी गृहविभागाने जाहीर केली आहे. तर गेल्या महिन्यात २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यात करण्यात आलेल्या असून महिन्याभरात एकूण १३४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत मुंबईतून बदली करण्यात आलेले वादग्रस्त पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची पुन्हा एकदा मुंबईत बदली दाखविण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भारतीय पोलीस सेवेतील आणि महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईतील परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यस्था या ठिकाणी बदली झाली असून पोलीस उपायुक्त एम.रामकुमार यांची बदली मुंबई पोलीस दलात झाली आहे. तर परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक याची बदली राज्य राखीव पोलीस दल नवी मुंबई येथे करण्यात आली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मुंबईसह राज्यभरातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांना अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. गृहविभागाकडून सोमवारी १०९ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकारी यांच्या बदल्याची यादी जाहीर करण्यात आली आहे, दरम्यान गेल्या महिन्यात २० ऑक्टोबर रोजी २५ पोलीस उपयुक्त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या. मुंबईसह राज्यभरात आतापर्यंत १३४ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बदल्यांमध्ये भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि महाराष्ट्र पोलीस सेवेतील (मपोसे) अधिकारी यांचा समावेश आहे. बदल्या करण्यात आलेल्या यादीमध्ये वादग्रस्त पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांचा समावेश असून पठाण यांना पुन्हा एकदा मुंबई दाखविण्यात आली आहे.

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात काही पोलीस अधिकाऱ्यांसह अकबर पठाण यांच्या नावाचा समावेश होता. अकबर पठाण हे मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेत पोलीस उपायुक्त होते. खंडणीच्या गुन्ह्यात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली होती. दरम्यान मुंबईतून अनेक पोलीस उपायुक्तांची बदली इतर जिल्ह्यात करण्यात आली असून त्यात मंजूनाथ सिंगे, प्रणय अशोक, परिमंडळ ८चे धोंडोपंत स्वामी यांच्यासह काही अधिकारी यांचा समावेश आहे, तर इतर जिल्ह्यातून मुंबईत मोठ्या प्रमाणात अधिकारी दाखविण्यात आले आहे. ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर, नवी मुंबई , पालघर , रायगड, नाशिक शहर , ग्रामीण, पुणे शहरातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.