राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे वारे; २५ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

144
राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे वारे सुरू झाले आहेत. राज्य सरकारने पोलीस उपायुक्त दर्जाच्या २५ अधिकाऱ्यांची बदल्यांची  पहिली यादी गुरुवारी जाहीर केली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक औरंगाबाद येथे बदली करण्यात आली असून, मुंबईतील परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त निलोतपल यांची  पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तर धनंजय कुलकर्णी यांना रत्नागिरी पोलीस अधीक्षकपदी वर्णी लागली आहे.
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्यासाठी गुरुवारी सरकारला मुहूर्त मिळाला आहे. मार्च ते एप्रिल या महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पहिली यादी २० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. या यादीत राज्यातील २५ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकऱ्यांचा समावेश आहे. मागील अनेक महिन्यापासून पदास्थापनेच्या प्रतीक्षेत असणारे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांची रत्नगिरी पोलीस अधीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद  ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड  पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तर सातारा पोलीस अधीक्षक म्हणून शेख समीर अस्लम यांची वर्णी लागली आहे.
( हेही वाचा: ठाण्यात नौपाडा परिसरातील दिवाळी पहाट कार्यक्रमामुळे वाहतुकीत होणार असा बदल )

गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, पोलीस अधीक्षक पोलीस अकादमी नाशिक शिरीष सरदेशपांडे हे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, राकेश ओला एसीबी नागपूर ते पोलीस अधिक्षक अहमदनगर, एम राजकुमार लोहमार्ग नागपूर ते जळगाव पोलीस अधीक्षक, संदीप गिल राज्य राखीव दल हिंगोली ते हिंगोली पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे मुंबई पोलीस उपायुक्त ते नांदेड पोलीस अधीक्षक, ठाणे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील नागपूर पोलीस प्रशिक्षण, वादग्रस्त पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांची बदली विशेष सुरक्षा विभाग (व्हीआयपी सुरक्षा) या ठिकाणी करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.