आदित्य ठाकरेंचे लक्ष उपनगराकडे: पदपथांपाठोपाठ बस स्टॉपही नवी ढंगात दिसणार

166

मुंबईच्या रस्त्यांवरील स्टीलच्या बस स्टॉपमध्ये पूर्णपणे बदल केला जात असून मुंबईकरांना आता पारदर्शक बस स्टॉप उपलब्ध् करून दिले आहे. या बस स्टॉपवर निवाराही असेल आणि पारदर्शक असल्याने स्टॉपच्या मागून चालणाऱ्या प्रवाशाचीही हालचालीही प्रवाशांना टिपता येणार आहे. त्यामुळे हे बस स्टॉप आता वेगळ्याच लूकमध्ये पहायला मिळणार असून प्रायोगिक तत्वावर उपनगरातील १०० हून अधिक ठिकाणी असे बस स्टॉप बसवले जाणार आहे.

मुंबई उपनगरांमध्ये एकूण ४०० बस स्टॉप बसवले जाणार

मुंबईतील शामाप्रसाद मुखर्जी चौक आणि मुंबई विद्यापीठाच्या मागील बाजुला रस्त्यांच्या दोन्ही बाजुला पदपथांची सुधारणा करत नव्या डिझाईनचे बस स्टॉप बसवण्यात आले आहे. चौरस आकाराच्या या बस स्टॉपमधील मागील बाजू ही ऍक्रेलिकच्या काचेमुळे पारदर्शक दिसत असून बसण्यासाठी दोन लांब स्टीलचे छोट्या आकाराचे बेंच आहेत. ज्यावर प्रवाशी बसून बसची प्रतीक्षा करु शकतील. शहरात प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आलेल्या या बस स्टॉपच्या धर्तीवर मुंबई उपनगरांमध्ये एकूण ४०० बस स्टॉप बसवले जाणार आहे. त्यातील १०५ बस स्टॉप पहिल्या टप्प्यातील उपनगरांमधील रस्त्यांवर बसवले जाणार आहे.

bmc 1 1

उपनगरात बस स्टॉप आकर्षक बसण्याचा निर्णय

मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपनगरांमधील विविध सुविधा आणि विकासकामांसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार विविध रस्त्यांच्या पदपथांच्या सुधारणांसाठी काही निवडक रस्त्यांच्या पदपथांची सुमारे कोट्यवधी रुपयांची कामे हाती घेतल्यानंतर आता उपनगरांमधील बस स्टॉपचे नुतनीकरण तथा आकर्षक बस स्टॉप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उपनगरांमधील काही रस्त्यांवर १०५ बस स्टॉप बसवले जाणार आहे. यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तब्बल ८ लाख रुपयांचे एक बस स्टॉप असून महापालिकेच्या अंदाजापेक्षा २० ते २५टक्के कमी दरामध्ये बोली लावून कंत्राटदाराने हे काम मिळवले आहे.

(हेही वाचा – सोमय्यांवरील हल्ला महागात पडेल, चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा )

बस स्टॉपच्या सुधारणांसाठी निधी मंजूर

यासंदर्भात नियोजन विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून पदपथांच्या सुधारणा आणि सौंदर्यीकरणासोबत बस स्टॉपच्या सुधारणांसाठीही निधी मंजूर केला आहे. त्यानुसार महापालिकेला निधी उपलब्ध झाल्याने उपनगरांमध्ये पहिल्या टप्प्यात १०५ बस स्टॉप बसवले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून भविष्यात आणखी २०० बस स्टॉप बसवले जाणार आहे. त्यामुळे एकूण ४०० बस स्टॉप अशाप्रकारे बनवले जाणार असून याबाबतचा निधी उपलब्ध झाल्यानंतर पुढील बस स्टॉपचीही कामे हाती घेतली जातील,असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.