मेट्रो ३ च्या कारशेडवरील वृक्षकत्तलीच्या मुद्द्यावरुन रणकंदन माजलेलं असतानाही आरेत पुन्हा झाडे कापली जात असल्याचं आरे वाचवा मोहिमेच्या सदस्यांना दिसून आले आहे. या जागेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आरे व्हीआयपी अतिथी गृह, आरे नर्सरी, गावदेवी मंदिर आणि रॉयल पाल्म, युनिट क्रमांक ३२ या भागांत काही झाडे कापली गेल्याचे आरे वाचवा मोहिमेच्या सदस्यांना आढळून आले आहे.
झाडं तोडल्याची नव्यानं अधिका-यांना तक्रार
वृक्षकत्तलीच्या निषेधार्त आरेप्रेमींनी थेट आरेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना पत्राद्वारे याबाबतीत विचारणा केली आहे. या तीन ठिकाणांपैकी २१ नोव्हेंबर रोजी आरे व्हिआयपी अतिथी गृहाच्या परिसरातील काही झाडे कापल्याचं स्वयंसेवकांना आढळून आलं आहे, तर अगोदरच्यादिवशी आरे नर्सरी आणि गावदेवी मंदिराजवळील झाडे कापली गेली होती. या भागांत पुन्हा काही झाडे कापल्याचं २ डिसेंबरलाही दिसलं आहे. त्याच दिवशी रॉयल पाल्मजवळही काही झाडे कापली गेल्याचं स्वयंसेवकांच्या निदर्शनास आलं होतं. या तिन्ही ठिकाणांतील झाडांच्या कत्तलीची तक्रार आरे वसाहतीच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना गुरुवारी ९ डिसेंबर रोजी दिली गेली आहे. मात्र त्याअगोदरच्या दिवशी ८ डिसेंबरला युनिट नंबर ३२ मध्येही झाडं कापल्याचं नंतर स्वयंसेवकांना माहितगारांकडून समजलं. याठिकाणी भेट दिली असता युनिट नंबर ३२ मध्येही झाडं तोडल्याची नव्यानं मुख्य कार्यकारी अधिका-यांना तक्रार करण्यात आली आहे.
(हेही वाचा- भाजप कार्यकर्त्यांविषयी ‘तो’ अपशब्द वापरणं राऊतांना पडलं भारी, दिल्लीत गुन्हा दाखल)
छुप्या मार्गाने ही वृक्षतोड होतेय?
याआधीही फेब्रुवारी २०२१ मध्येच आरेत झाडं कापताना आरे वाचवा मोहिमेच्या स्वयंसेवकांनी पाहिलं होतं. झाडं तोडण्याबाबतचा जाब विचारताच संबंधितांना संबंधित माणसांनं कु-हाडंच स्वयंसेवाकांच्या हातात देत तुम्हीच काम करा, असं सांगितलं. हे प्रकरण पत्रातून आरे वाचवा मोहिमेच्या स्वयंसेवकांनी आरेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना आठवून दिलं. याबाबतीत वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेतलीय का, असा प्रश्न आरे वाचवा मोहिमेच्या सदस्यांनी उपस्थित केलाय. कोणत्या कारणास्तव या छुप्या मार्गाने ही वृक्षतोड होतेय, अशी विचारणाही आरे वाचवा मोहिमेअंतर्गत एकत्र लढणार्या पर्यावरणप्रेमी संस्थांनी केली आहे.
आरेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना तक्रार करणा-या पर्यावरणप्रेमी संस्था
युथ फॉर आरे, रिवाइन्डिंग आरे, फ्रायडेज फॉर फ्यूचर, आरे कॉन्झर्वेशन ग्रु.
Join Our WhatsApp Community