रायगडमधील कट्टर शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नाव चक्क ‘शिवसेना’ ठेवले

शिवसेनेत फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शिवसैनिकही विभागले गेले. परंतु शिवसेनेवर अफाट आणि अतूट प्रेम असणारे शिवसैनिक मात्र अस्वस्थ झाले. आता मात्र एका घटनेने शिवसैनिकाचे शिवसेनेवर किती प्रेम आणि श्रद्धा आहे हे दिसून आले आहे. रायगडमधील एका कट्टर शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नाव चक्क शिवसेना असे ठेवले आहे. त्याने हा नामकरण सोहळा थाटात पारही पाडला.

( हेही वाचा: १०० पैकी २६ टक्के मोदींची जादू! मोदी लाट अजून संपली नाही? )

….म्हणून शिवसेना नाव ठेवलं

महाड तालुक्यातील किये- गोठवली माजी उपसरपंच पांडुरंग वाडकर यांनी आपल्या मुलीचे नाव शिवसेना ठेवले आहे. वाडकर यांच्या घरी कन्यारत्नाचा लाभ झाला. 17 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलीचा जन्म झाला. त्याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन होता.

मुलीच्या जन्माच्या आदल्या रात्री पांडुरंग वाडकर यांच्या स्वप्नात साक्षात बाळासाहेब ठाकरे आले आणि त्यांनीच त्यांना मुलीचे नाव शिवसेना ठेव असे सांगितले. बाळासाहेब स्वप्नात आले. त्यांनी आदेश दिला आणि बाळासाहेबांचा आदेश पाळत मानून वाडकर यांनी आपल्या मुलीचे नाव शिवसेना ठेवले.

त्यासाठी नामकरण सोहळा आयोजित केला. त्यांनी स्टेजवर मोठा बॅनर लावला. बॅनरवर बाळासाहेबांचा भला मोठा फोटो होता. बॅनरवरील महाराष्ट्राच्या नकाशात ‘माझे नाव शिवसेना’, असे लिहिले होते. लायटिंग लावण्यात आली होती. पाहुण्यांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या.

काय म्हणाले वाडकर ?

बाळासाहेबांचा स्मृती दिन होता. त्याच दिवशी 17 तारखेला माझ्या घरात मुलगी जन्माला आली. सकाळी 7 वाजता मुलीचा जन्म झाला. त्या रात्री बाळासाहेब स्वप्नात आले. त्यांनी हे नाव सूचवले. बाळासाहेब माझे दैवत आहेत. भरत गोगावले हे माझे नेते आहेत. त्यामुळे मी बाळासाहेबांचा आदेश मानून मुलाचे नाव शिवसेना ठेवले, असे वाडकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here