शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो…संगीत विश्वातून श्रद्धांजली

128

गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण भारतवर्षावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जगभरातून लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात येत असून, स्वर्गीय सूर अखेर शांत झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. संगीत विश्वातून लता ताई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : स्वर्गीय सूर हरपला…गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली )

संगीत विश्वातील अनेक दिग्गजांनी लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुमन कल्याणपुर यांनीही लता दीदींशी अत्यंत जवळचे नाते असून त्यांच्या जाण्याचे दु:ख कायम मनात राहील अशा भावना व्यक्त केल्या आहेत. संगीत दिग्दर्शक आणि बहुमुखी-बहुभाषी कलाकार ए आर रहमान यांनी शोक व्यक्त केला. ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना रहमान म्हणाले, ” लता मंगेशकर जी यांना आदर…प्रेम आणि प्रार्थना” आम्हांला बर्‍याच गोष्टी शिकवणाऱ्या महान व्यक्तिमत्वाला माझी श्रद्धांजली असे ट्वीट गायक- संगीतकार ए. आर रहमान यांनी केले आहे. तसेच सोशल मिडियावर व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.

श्रेया घोषाल, उदीत नारायण, सुदेस भोसले यांनी स्वरसम्राज्ञी लता दीदींचा आवाज दैवी आहे. स्वरसम्राज्ञी लतादिदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. असे म्हणत या दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

आज सरस्वती विसर्जनाच्या दिवशी आपल्या माता सरस्वती आपल्यातून नाहीशा झाल्या. त्यांच्या आवाजातून कायम त्या आपल्यासोबत असतील असे ट्वीट करत सुरेश वाडकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.