“हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण”, स्वातंत्र्यवीर सावरकरांना सोशल मीडियावर अभिवादन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५७ व्या आत्मार्पण दिनानिमित्त त्यांना अनेक दिग्गजांनी अभिवादन केले आहे. तसेच सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी वीर सावरकरांचे विचार, त्यांचे साहित्य, मातृभूमीवर असलेले प्रेम याविषयीच्या पोस्ट शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

( हेही वाचा : Targeted Killing: जम्मू-काश्मिरात पुन्हा हिंदू तरुणाचे ‘टार्गेट किलींग’; गोळ्या झाडून हत्या)

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना अभिवादन करत आहे. कार्टुनिस्ट स्वानंद गांगल यांनी ट्विटरवर वीर सावरकरांचे व्यंगचित्र शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

वोकफ्लिक्स या पेजने थोर राष्ट्रवादी आणि स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकरांना आत्मार्पण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करत अंदमान जेल आणि सामान्य आयुष्य यातील फरक दर्शवला आहे.

वीर सावरकर लीग या ट्विटर पेज मार्फत नेहमीच वीर सावरकरांचे अद्भूत विचार मांडले जातात. यावर देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो हा विचार शेअर करत अभिवादन करण्यात आले आहे.

राजकीय वर्तुळातून सुद्धा दिग्गजांनी वीर सावरकरांना आदरांजली वाहिली आहे. थोर देशभक्त, महान क्रांतिकारक, ओजस्वी वक्ता व प्रतिभाशाली साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम असे ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

 

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ।। प्रखर राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यदेवीचे सच्चे उपासक, थोर क्रांतिकारक, हिंदुत्वाचे विद्यापीठ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्मृतिदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोटी कोटी अभिवादन केले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here