भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, 14 एप्रिल, 2025 रोजी विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
(हेही वाचा West Bengal Violence : रस्त्यांवर जाळपोळ, इंटरनेट बंद … ; मुर्शिदाबाद हिंसाचाराचे काही Unseen Photos)
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-4 शिवदर्शन साठ्ये, उप सचिव विजय कोमटवार, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती यांचे विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
Join Our WhatsApp Community