मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, ट्रक-बसच्या धडकेत 15 प्रवासी जखमी, दोघे गंभीर

112

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील प्रवासी मोठ्याप्रमाणावर जखमी झाल्याची माहिती आहे. ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघातानंतर तिथल्या स्थानिकांसह हायवेवरून जाणारे प्रवासी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीपासून 40 किमीच्या अंतरावर हा अपघात रविवारी झाला आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांकरता हलवण्यात आले आहे.

(हेही वाचा – FASTag: आता टोल नाक्यावर टोल-टॅक्स कापणार नाही! कोणता असणार नवा पर्याय?)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाला, त्यामुळे हा ट्रक डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसला आणि एका बसला आदळला. बस पूर्णपणे भरलेली होती, बस मधील एकूण 15 प्रवाशांना दुखापत झाली आहे. यापैकी 2 जण अत्यंत गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

ट्रक नंबर MH-40- BG- 3457 चा चालक नावेद खान हा पुण्याहून मुंबईकडे जात होता, तेव्हा ट्रकचा ब्रेक फेल झाला. यामुळे मुंबई लेनमधून जाणारा ट्रक डिव्हायडर तोडून पुणे लेनमध्ये घुसला आणि बस नंबर KA-41-D-1471ला जाऊन आदळला, ज्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात नागपूरचा राहणारा ट्रक चालक नावेद खान आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह इतर 13 जणांना रूग्णवाहिकेने उपचाराकता रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.