‘तुनिषा शर्माचा मृत्यू, हा लव्ह जिहाद’च ‘या’ भाजप नेत्याने केला दावा

130

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर मनोरंजन क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. याशिवाय या प्रकरणात दररोज नवीन खुलासेही होत आहेत. तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा कथित प्रियकर शिझान खान याला रविवारी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आता भाजप आमदार व मंत्र्यांकडून हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चा विषय असल्याचा दावा केला जात आहे.

भाजप नेते गिरिश महाजन यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही पाहत आहोत की, दिवसेंदिवस ही प्रकरणे वाढतच आहेत आणि आम्ही या विरोधात कडक कायदा आणण्याचा विचार करत आहोत.

( हेही वाचा: दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे न्यायालयात जाणार? )

नेमके काय घडले?

24 डिसेंबर रोजी दुपारी तुनिषाने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर तिचा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तुनिषाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी पोलिसांनी तपासाची अधिकृत माहिती दिलेली नाही. शिझान खानची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते, हे समोर येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.