‘मी माळकरी म्हणून मला कोरोना होणार नाही’, असं म्हणणाऱ्या इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा

माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट असणार, मला कोरोना झाला नाही कारण मी माळकरी आहे, असं विधान इंदूरीकर महाराज यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या तृप्ती देसाई संतापल्या आहेत. इंदुरीकर महारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे, असे जनतेला वाटेल असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

तृप्ती देसाई संतापल्या

कोरोना ही महाभयंकर महामारी असून, देशात तिसरी लाट आली आहे. त्यातच सरकारसुद्धा जनजागृती करत आहे. परंतु स्वत:ला किर्तनकार म्हणवणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असं बोलून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी ठेवलेल्या प्रवचनाला इंदुरीकरांना बोलवले जाते आणि गर्दी जमा होते. आता लवकरच निवडणुका आहेत केवळ म्हणूनच त्यांना दरवेळी पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो. याआधी सुद्धा त्यांना कोरोनावर केलेल्या वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई न करता सूट दिली होती, मात्र हिंमत असेल, तसेच आपल्या राज्यात सर्वांसाठी कायदा समान असेल, तर इंदुरीकरांच्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करा असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: मुंबईकरांनो, डबेवाल्यांच्या सेवेत होणार ‘हा’ मोठा बदल! )

नेमक काय म्हणाले इंदुरीकर

आधीच्या दोन लाटांमध्ये फार मोठ नुकसान सहन करावं लागलं आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान दुसऱ्या लाटेतून वाचलो असल्याने तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत. मी माळ घातली आहे म्हणून मला कोरोना झालेला नाही, तसेच तुमचा आणि माझा जन्म नाही तर पुनर्जन्म आहे. तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचंही म्हटलं. यावेळी इंदुरीकर महाराजांनी हसत हसत जगा असा उपदेशही दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here