तुर्की आणि सिरीयमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 45 हजार लोकांचा जीव गेला आहे. तर भूकंपाच्या 10 दिवसांनंतरही तिथे बचावकार्य सुरु आहे. एकीकडे जिथे ढिगाऱ्याखालून मृतदेह काढले जातं आहेत तिथे दुसरीकडे मात्र तिघांची भूकंपाच्या 10 दिवसांनंतरही ढीगऱ्याखालून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हा चमत्कारच म्हणावा लागेल.
( हेही वाचा: शिवसेना शाखांनाच पोलीस संरक्षण देण्याची आली वेळ! )
भूकंपातील मृतांचा आकडा 45 हजारांवर
तुर्की आणि सिरीयामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे येथील घरे आणि इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. या विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा 45 हजारांवर गेला आहे. फक्त तुर्कीमध्ये 38 हजार आणि सिरीयामध्ये 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपात 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
भारतासह 84 देशांच्या पथकांकडून बचावकार्य सुरु
6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सिरियामध्ये मोठा भूंकप आला. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. भूंकपानंतर सुमारे 100 हून अधिक आफ्टर शाॅक बसले. भूंकपग्रस्त भागात मदतीसाठी भारताने NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवले. भारतासह इतर 84 देशांच्या बचाव पथकांकडून तुर्की आणि सिरियामध्ये बचावकार्य सुरु आहे.
Join Our WhatsApp Community