सिरीया आणि तुर्कस्तानमधील भीषण भूकंपाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूकंपाच्या या तीव्र धक्क्यामुळे मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेl. आतापर्यंत 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाने पुन्हा एकदा इमारतींच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भूकंपरोधक इमारतींची आवश्यकता असल्याचे अनेकांना वाटते आहे. भूकंपरोधक इमारतीचे बांधकाम सामान्य इमारतीपेक्षा वेगळे असते. तसेच भुकंपरोधक इमारती बांधण्यासाठी सामान्य इमारतींपेक्षा ५ ते १० टक्के जास्त खर्च येतो, असे एक्सपर्ट सांगतात. पण खरंच भूकंपरोधक इमारतींना भुकंपाचा धक्का लागत नाही? यासाठी भुकंपरोधक इमारतींच्या बांधकामासंबधी सविस्तर जाणून घेऊया.
( हेही वाचा: Twitter Blue Tick: आजपासून भारतीयांच्या सेवेत; दरमहा मोजावे लागणार ‘इतके’ रुपये )
भूकंप प्रतिरोधक इमारती बनवण्याचे काही मार्ग
इमारतीचे फाउंडेशन लवचिक बनवणे- भूकंप लहरींचा प्रतिकार करण्यासाठी इमारतीचा पाया बांधताना बेस आयसोलेश पद्धतीचा वापर करावा. या आयसोलेशन पॅडमध्ये सामान्यत: रबर, शिसे, स्टील यांचा समावेश असतो. भूकंपाच्या वेळी इमारतीच्या पायथ्याची हालचाल होते. तर संपूर्ण इमारतीची रचना स्थिर राहते.
बांधकामासाठी भूकंप प्रतिरोधक साहित्य- भूकंप प्रतिरोधक इमारती बांधताना उत्कृष्ट दर्जाच्या साहित्यांचा वापर करणे आवश्यक आहे. सध्या आधुनिक बांधकामात स्ट्रक्चरल स्टीलचा वापर करण्यात येतो. हा एक घटक आहे जो विविध आकारांमध्ये येतो. स्ट्रक्चरल स्टीलच्या वापरामुळे इमारती कोलमडून पडत नाहीत.
बांधकाम स्ट्रक्चर मजबूत करणे- भूकंप प्रतिरोधक इमारती बांधण्यासाठी क्रॉस ब्रेसिज आणि शिअर वॉल पद्धतीचा वापर करु शकता. शिअर वॉल अनेक पॅनल्सने बनवलेले असतात आणि भुकंपावेळी इमारतीला मजबूत राहण्यासाठी मदत करतात. तसेच इमारत मजबूत करण्यासाठी क्षण-प्रतिरोधक फ्रेम्स(Moment-resisting frame) आणि डायाफ्राम(Diaphragm) देखील आवश्यक आहे.
GFRG (Glass Fibre Reinforced Gypsum) पॅनलचा वापर- GFRG पॅनलला रॅपिड वॉल असेही म्हटले जाते. इमारतीमध्ये GFRG पॅनलचा वापर केल्याने भूकंपामुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. कारण पॅनलमध्ये कातरणे असल्यामुळे भूकंपाच्या लहरींना अडथळे निर्माण होतात.
Join Our WhatsApp Community