बहिण असावी तर अशी! चिमुकलीने तुर्की भूकंपात अडकलेल्या आपल्या लहान भावाचा वाचवला जीव

कधी कधी लहान मुलं असं काही काम करुन जातात, ज्याने मोठ्यांनाही दोन गोष्टी शिकता येतात. बातमी तशी फेब्रुवारी महिन्यातल्या दुसर्‍या आठवड्यातली असली तरी अत्यंत महत्वाची आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला होता. त्याबद्दलच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुर्की आणि सिरीयामध्ये भूकंप आला होता. ७.८ रिक्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. अनेक इमारती पडल्या आणि स्मशानात रुपांतरीत झाल्या. या भूकंपात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला. भारतानेही मदत केली. या सर्व गोष्टी घडत असताना, एक सुखावणारी आणि प्रेरणा देणारी गोष्ट घडली. जी या व्हिडिओमध्ये कैद झाली. The Figen नावाच्या वापरकर्त्याने हा व्हिडिओ ट्विट केला आहे आणि पाहता पाहता हा व्हिडिओ जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला. या व्हिडिओला लाखो व्यूज मिळाले आहेत.

( हेही वाचा: देशभरात 70 हून अधिक ठिकाणांवर NIA ची छापेमारी; काय आहे प्रकरण? )

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी आपल्या लहान भावासह ढिगार्‍याखाली अडकलेली दिसतेय. महत्वाचं म्हणजे ती आपल्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ही चिमुकली आपल्या भावाचे रक्षण करताना दिसत आहे. या मुलांना ढिगार्‍याखाली सापडल्यामुळे जखमा झाल्या असल्या तरी दोघंही सुरक्षित असल्याचे दिसत आहेत. आपल्या भावाविषयी प्रेम आणि समर्पण भाव या मुलीच्या मनात आहे. त्याचबरोबर ही स्वतः इतकी लहान असून आपल्या भावाचं रक्षण करत आहे. म्हणून लोक तिला रणरागिणी म्हणत आहेत. या व्हिडिओला जगभरात तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here