- ऋजुता लुकतुके
मोटोक्रॉस आणि ऑफ- रोड बाईकमध्ये टीव्हीएस कंपनीचा हातखंडा आहे. आणि जगभरात त्यांच्या अशा बाईक पोहोचल्या आहेत. आता कंपनीचं लक्ष ॲडव्हेंचर बाईककडे गेलं आहे. नवीन बाईक भारतात पुढील वर्षी मार्च महिन्यात येऊ शकते. ती नेमकी कशी दिसेल हे कंपनीने जराही सांगितलेलं नाही. पण, ती मोटो स्पोर्ट्समधील बाईक असली तरी ती दिसायला कंपनीच्या इतर ऑफ-रोड बाईकसारखी दिसेल असा अंदाज आहे. (TVS ADV)
(हेही वाचा- Pune Porsche Car Accident : ‘त्या’ 300 शब्दांच्या निबंधाविषयी संतापच; जामीन प्रक्रियेत त्रुटी आढळल्याचा अहवाल)
इंजिन म्हणाल तर ते कंपनीच्या अपाचे आर आर ३१० प्रमाणेच असेल असा अंदाज आहे. म्हणजेच हे इंजिन ३४ बीएचपी इतकी ताकद निर्माण करू शकेल. तर ४ स्ट्रोक लिक्विड कूल्ड इंजिन बाईकमध्ये असेल. ६ स्पीड गिअरबॉक्स या बाईकमध्ये असेल. (TVS ADV)
ADV GUARDS FOR TVS APACHE SERIES FROM LLUVIA INDUSTRIES.
ORDER NOW AT https://t.co/mtOzA44CYk#lluviaindustries #lluviaturizmo #TVSeries #tvsmotors #Apache #apache160 #apache200 #travel #travelbloggers #traveling #travelblogger #traveler #BikeTO #bike #BikerGirl #Riders pic.twitter.com/3cHl9AmUg2
— lluviaindustries (@LLUVIATURIZMO) December 13, 2022
बाईकमध्ये डिस्क ब्रेक असतील आणि ते दोन्ही चाकांना बसतील. २०२४ सालच्या तिसऱ्या तिमाही टीव्हीएस कंपनी अधिकृतपणे या बाईकची घोषणा करेल असा अंदाज आहे. या बाईकची किंमत २.६ लाख ते २.८ लाख रुपये इतकी असेल असा अंदाज आहे. लाँच झाल्यावर तिची स्पर्धा केटीएम २५० या ॲडव्हेंचर बाईकशी असेल. (TVS ADV)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community