जम्मू-काश्मीर; बस अपघातात 25 प्रवासी जखमी

93

जम्मू-काश्मीरच्या बत्तल बालियान भागात शनिवारी सकाळी बस उलटून झालेल्या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असून, सर्व प्रवाशांना जम्मूच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

…म्हणून अपघात झाला असावा

जम्मूहून डोडा जिल्ह्यात येणारी बस उधमपूरच्या बत्तल बालियान भागात उलटली. बसमधील 25 प्रवासी जखमी झाले असून, जखमींना उधमपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर 6 गंभीर जखमी प्रवाशांना जम्मूतील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे बस कंट्रोल करता आली नसावी, त्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

( हेही वाचा: राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर नवनीत राणांचे बॅनर; पंतप्रधानांसह भाजपच्या बड्या नेत्यांचे फोटो )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.