Twitter Account block: सरकारच्या आदेशानुसार, ट्वीटरने 1122 URL केले ब्लाॅक

80

मायक्रोब्लाॅगिंग साइट ट्वीटरने आयटी मंत्रालयाच्या सुचनेनुसार, यावर्षी जूनपर्यंत 1,122 URL ब्लाॅक केले आहेत. ही माहिती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बुधवारी लोकसभेत दिली. ब्लाॅकिंगची ही कारवाई आयटी कायदा, 2000 च्या कलम 69 A च्या तरतुदीनुसार, कोणत्याही सोशल मीडियाची साइट सुरक्षित आहे का? याची खात्री करण्यात येते. ब्लाॅक केलेल्या URL ची संख्या 2018 मध्ये 225, 2019 मध्ये, 1 हजार 41 आणि 2021 मध्ये 2 हजार 851 होती.

ट्वीटर युजर्सचा डेटा लीक

ट्वीटर युजर्सचा डेटा लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. ट्वीटरचा सुमारे 5.4 दशलक्ष युझर्सचा वैयक्तिक डेटा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता. री-स्टोअर प्रायव्हसीच्या अहवालानुसार, या वर्षी 2022 मध्ये युजर्सचा डेटा हॅक झाला होता. माहितीसाठी, हा डेटा लीक झाला होता, ज्यासाठी ट्वीटरने बग बाउंटी प्रोग्राम अंतर्गत झिरिनोव्स्की नावाच्या हॅकरला $5 हजार 40 जवळपास 4 लाख 2 हजार रुपये दिले होते.

( हेही वाचा: ज्या विषयात कळत नाही, तिथे राज्यपालांनी चोमडेपणा करु नये; राज्यपालांच्या वक्तव्यावर मनसे आक्रमक )

46 हजारहून अधिक खात्यांवर बंदी

ट्वीटरने आपल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल मे महिन्यात भारतीय वापरकर्त्यांच्या 46 हजार हून अधिक खात्यांवर बंदी घातली होती. ट्वीटरने रविवारी त्यांच्या मंथली कंपाइलेंस रिपोर्टमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार, ट्वीटरने बाल लैंगिक शोषण, नाॅन कन्सेनच्युअल न्यूडिटी आणि इतर अशाच प्रकारच्या कंटटेसाठी 43 हजार 656 खात्यांवर बंदी घातली आहे, तर दहशतवादाला प्रोत्साह देण्याबद्दल 2 हजार 870 खाती बॅन केली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.