एलॉन मक्सने गेल्या वर्षी ४४ बिलीयन डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केले. त्यानंतर मक्सने ट्विटरमध्ये अनेक बदल केले. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने याआधी इतर देशात ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन सेवेची सुरूवात केली होती. आता ही सब्सक्रिप्शन सेवा भारतात सुरू करण्यात आली आहे. भारतात ब्लू टिकसाठी वेब युझर्सना दरमहा ६५० रूपये तर मोबाईल युझर्सना ९०० रूपये मोजावे लागणार आहेत. तर वर्षभराच्या सब्सक्रिप्शनसाठी ६ हजार ५०० रुपये आकारले जाणार आहेत.
( हेही वाचा: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देशासाठी महत्त्वपूर्ण; मुंबई उच्च न्यायालय )
ट्विटर ब्लू टिकचे फायदे कोणते?
- ट्वीट एडीट करणे. ट्वीट अन्डू करणे.
- दीर्घ आणि चांगल्या गुणवत्तेचे व्हिडीओ पोस्ट करणे.
- प्रोफाइल फोटो, थिम्स, नेव्हिगेशन ऑप्शन्स यांमधील नवीन अपडेट्सचा वापर करता येणार आहे.
- ट्विटरवर शोध किंवा संभाषण दरम्यान ब्लू टिक वापरकर्ते पहिल्या स्थानी असतील.
- हवे तेवढे बुकमार्क्स आणि बुकमार्क फोल्डरची सुविधा मिळेल.
- ट्विटर ब्लू टिक वापरकर्त्यांना इतरांपेक्षा निम्म्या जाहिराती दिसतील.
- युजर्सना ट्विटसाठी ४ हजार अक्षरांची मर्यादा मिळणार आहे.