ट्विटरचा मालक बदल्यानंतर आता ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठे बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी धडाधड एकामागे एक निर्णय घेण्यास सुरूवात केली. यादरम्यान, त्यांनी सीईओ आणि त्यांच्यासह असणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. यानंतर मस्क यांनी आपला मोर्चा थेट संचालक मंडळाकडे वळविला आहे.
मस्क यांनी ट्विटरचं संचालक मंडळ बरखास्त केलं असून ट्विटरच्या सर्व संचालकांना हटवून त्यांनी कंपनीची कमान हाती घेऊन वन मॅन शोची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता मस्क एकमेव डायरेक्टर बनले आहेत. संचालक मंडळातील मस्क यांनी ज्या डायरेक्टर्सना हटविले आहे, त्यात मार्था लेन फॉक्स, ओमिड कोर्डेस्टानी, डेविड रोसेनब्लैट, पैट्रिक पिचेट, एगॉन डरबन, फी-फी ली आणि मिमी अलेमायेहौ यांचा समावेश आहे.
(हेही वाचा – एलॉन मस्कला Twitter डील पडली महागात, मालक होण्याच्या नादात बुडाले इतके कोटी डॉलर)
मस्क यांनी असे जाहीर केले की, ते लवकरच ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारतील. यामुळे मस्क हे येत्या काळात अनेक मोठे निर्णय घेऊ शकतात. ट्वीटरची डील पूर्ण झाल्यानंतर मस्क हे ट्विटरचे मालक बनले. त्यानंतर त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवले. आता त्यांनी ट्विटरचे संचालक मंडळही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community