Twitter Down: जगभरातील अनेक भागात ट्विटर डाऊन! युजर्स हैराण, अकाऊंट ऍक्सेस करण्यात अडचणी

192

आज, शुक्रवारी सकाळपासून अनेक युजर्सना त्यांचे ट्विटर अकाऊंट ऍक्सेस करण्यात अडचणी आल्याचे समोर आले आहेत. युजर्सना ट्विटरवर त्यांच्या फीडमध्ये ऍक्सेस करण्यास समस्या निर्माण होत असून फीड पेजवर, युजर्संना एक मेसेज पाठवला जात आहे. ज्यामध्ये Something went wrong, but don’t fret — let’s give it another shot. असे म्हटले आहे. असेही सांगितले जात आहे की, केवळ वेब युजर्सनाच या समस्येचा सामना करावा लागत आहे, कारण ज्यांच्याकडे अॅप आहे त्या युजर्सना कोणतीही अडचण नाही.

(हेही वाचा – Snapchat वापरताय तर सावधान! प्रायव्हसीमध्ये बग; नाशिकच्या विद्यार्थ्याने लावला शोध)

याआधी इंस्टाग्रामलाही काहिसा आउटेजचा सामना करावा लागला होता. अनेक युजर्सनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत तक्रारी केल्या होत्या. यावेळी युजर्सने असे सांगितले की, त्यांना इंस्टाग्राम पेज स्क्रोल करण्यापासून ते अकाऊंट लॉग आऊट करण्यापर्यंत अनेक समस्या येत आहेत. तर अनेक युजर्सनी त्यांचे अकाऊंट सस्पेंड झाल्याच्या तक्रारही केल्या होत्या. वेबसाइट्सवरील आउटेजचा मागोवा घेणारी साइट DownDetector नुसार, एलॉन मस्कच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मवर जगातील काही भागांमध्ये आउटेजचा परिणाम झाला आहे. मात्र आम्ही ट्विटर ओपन केले. मात्र ते काही युजर्ससाठी योग्य पद्धतीने काम करत आहे, तर काही लोकांना ते वापरण्यास अडचणी निर्णाम होत आहे.

भारतात फारसा परिणाम नाही

DownDetector च्या मते, ट्विटर आउटेज पहाटे 3 च्या सुमारास सुरू झाले आणि सकाळी 7 च्या सुमारास त्याची मोठी वाढ झाली. DownDetector च्या मते, ट्विटर डाऊन झाल्यामुळे भारतातील काही मोजक्या भागात ट्विटर डाऊन असल्याच्या समस्या उद्भवल्या. दरम्यान, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी अखेर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा ताबा घेतल्याने ट्विटर गेल्या एका आठवड्यापासून सतत चर्चेत आहे. मस्कने असे म्हटले की, ते ट्विटरवर बॅन युजर्स आणि अकाऊंट परत आणणार नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.