ट्विटरने ८ डॉलर पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय ‘या’ कारणामुळे घेतला मागे

91

ट्वीटर कंपनीने आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्वीटरचे नवे मालक एलाॅन मस्क यांनी ट्वीटरवरील ब्लू टिकसाठीच्या पेड सबस्क्रिप्शनचा (twitter Paid Subscription) निर्णय रद्द केला आहे. पेड सबस्क्रिप्शची सेवा सुरु झाल्यापासून बनावट अकाऊंटच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. (fake Account) त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ब्लू टिक विकत घेण्यासाठी आठ डाॅलर मोजावे लागणार नाहीत.

ट्वीटरची पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा बंद

अॅप बनवणा-या जेन मंजुन वोंग यांनी सांगितले की, ट्विटरने 8 डाॅलरच्या पेड सबस्क्रिप्शनच्या निर्णय मागे घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने ही सेवा कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ट्वीटर युजर्सने शुक्रवारी सांगितले की, नवीन ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन सेवा त्यांच्या iOS अॅपवरुन अचानक गायब झाली. यानंतर युजर्स संतापले होते.

( हेही वाचा: मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट ‘या’ कारणास्तव पुन्हा बंद? )

….म्हणून बदलावा लागला निर्णय

पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा सुरु होताच बनावट अकाऊंटवरुन आक्षेपार्ह ट्वीट केले गेले, ज्यामुळे ट्वीटरला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. एका व्यक्तीने Nintendo.Inc. नावाच्या प्रोफाईलवकर पेड सबस्क्रिप्शनने निन्टेंजो इंक कंपनीच्या नावाने फेक अकाऊंटवर ब्लू टिक घेत सुपर मारिओटा फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह ट्वीट केले. अशाचप्रकारे अनेकांनी फेक अकाऊंट उघडत आक्षेपार्ह ट्वीट केले आहेत. अखेर या पेड सबस्क्रिप्शचा गैरवापर केला गेल्याने ट्वीटरने ही सेवा बंद केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.