ट्विटरने लाँच केली ‘गोल्ड टिक’, फक्त ‘यांना’च मिळणार सुविधा; जाणून घ्या सविस्तर

109

ट्वीटरने बिझनेस ब्रॅंडसाठी गोल्ड व्हेरिफिकेशन चेकमार्क लाॅन्च केले आहे. सोमवारपासून ब्रॅंड प्रोफाईलला नवीन टिक मार्क देण्यात आले आहेत. ट्वीटरचे पेड फाॅर व्हिरिफिकेशन फीचर सोमवारी पुन्हा एकदा सुरु झाले आहे. गेल्या महिन्यात ते थांबवण्यात आले होते. याची किंमत अजूनही महिन्याला 8 डाॅलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु आता Apple डिव्हाइसवर Twitter अॅप वापरणा-यांसाठी 11 डाॅलर्स सबस्क्रिप्शन चार्ज घेण्यात येणार आहे.

ट्वीटरने लाॅंच केलेली गोल्ड टीक ही कंपन्यांसाठी लाॅंच करण्यात आली आहे. तर ग्रे टिक राजकीय किंवा सरकारी संस्थांसाठी आहे. ट्वीटरचे मालक एलाॅन मस्क यांनी आपल्या आधीच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आयफोन मोबाईमध्ये अॅप खरेदीवरील अॅपलच्या कमिशन शुल्काला त्यांचा विरोध आहे. Twitter Blue च्या अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये एडिट बटण समाविष्ट आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांची एडिट पर्याय उपलब्ध करुन देण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे. आधी ब्लू टिक्सचा वापर प्रामाणिकता आणि हाय- प्रोफाईल अकाऊंट म्हणून केला जात होता. ट्वीटरने हे मोफत दिले होते. मात्र, ट्वीटरचे नवे मालक इलाॅन मस्क यांचे म्हणणे आहे की, हे योग्य नाही. यानंतर त्यांनी पेड- फाॅर व्हेरिफिकेशन फीचरची घोषणा केली.

( हेही वाचा: महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यांविरोधात पुण्यात बंदची हाक; PMPML बस सेवाही राहणार बंद )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.