ट्विटरमधील 50 टक्के कर्मचारी एका झटक्यात काढण्याचा निर्णय नवे मालक एलाॅन मस्क यांनी घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आर्थिक मंदीचे सावट असताना, आता अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचा-यांची कपात सुरु केली आहे. ट्वीटर पाठोपाठ आता META कंपनीतील कर्मचा-यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. तिथेही कर्मचा-यांची कपात होणार असल्याची चर्चा आहे.
फेसबूकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफाॅर्म इंक या आठवड्यात कर्मचा-यांची कपात करु शकते, अशी माहिती मिळाली आहे. मेटामधील हजारो कर्मचा-यांना याचा फटका बसणार आहे. अमेरिकेतील वृत्तपत्र वाॅल स्ट्रीट जर्नलने याबाबत माहिती दिली आहे. वाॅल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असे म्हटले आहे की बुधवारपासून कर्मचा-यांना काढण्याची मोहिम सुरु होऊ शकते. याबाबत माहिती विचारली असता, मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीची कंपनीने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
( हेही वाचा: सुषमा अंधारे ठाकरे गटाला बळ देतील की दुबळं करतील? )
फेसबुकला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते
मेटा कंपनीचा आर्थिक विकासही मंदावला आहे. त्याचवेळी कंपनीने हा मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे कर्मचा-यांची धाकधूक वाढली आहे. बुधवारपासून कर्मचा-यांची कपात होणार असल्याची चर्चा आहे. मेटावर्सवर करण्यात आलेला खर्च, सध्याची स्थिती पाहता फेसबुकला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते अशी चर्चा आहे.
Join Our WhatsApp Community