एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले आणि ताबा मिळाल्यानंतर कंपनीत प्रचंड उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, एलॉन मस्क यांनी व्हेरिफिकेशन प्रक्रियेत म्हणजेच ब्ल्यू टिक देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याचे संकेत दिले होते. ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शनसाठी, युजर्सना दरमहा 8 डॉलर्स म्हणजेच साधारण 660 रुपये द्यावे लागणार आहे. जे अकाऊंट आधीच व्हेरिफाईड आहेत, त्यांना 90 दिवसांच्या आत सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल, अन्यथा ब्ल्यू टिक काढून टाकली जाईल, असे ट्विटरकडून सांगण्यात आले होते. यानंतर आता एलॉन मस्क यांनी ब्लू टिक संदर्भात नवी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनुसार अनेक युजर्सचे अकाऊंड सस्पेंड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा – या व्यक्तीने Twitter ला दिली कमाईची आयडीया; ज्यामुळे झाली एवढी मोठी उलथापालथ!)
दरम्यान, सोमवारी सकाळी एलॉन मस्क यांनी एक ट्विट करून युजर्सला या नव्या अपडेटबद्दल माहिती दिली. आपली ओळख बदलणारे प्रत्येक अकाऊंट सस्पेंड करण्यात येईल. पॅरोडी अकाऊंट असल्यास ते पॅरोडी अकाऊंट आहे, असे स्पष्टपणे नमूद करावे. अन्यथा कोणाचेही नाव किंवा फोटो वापरणारे अकाऊंट सस्पेंड करण्यात येईल असे ट्विटमध्ये मस्क यांनी म्हटले आहे.
Going forward, any Twitter handles engaging in impersonation without clearly specifying “parody” will be permanently suspended
— Elon Musk (@elonmusk) November 6, 2022
मस्क यांनी असेही म्हटले की, आम्ही अकाऊंट सस्पेंड करण्यापूर्वी एक चेतावणी दिली होती. परंतु आता आम्ही व्यापक स्वरूपात पडताळणी सुरू केली आहे. त्यानुसार, कोणतीही चेतावणी दिली जाणार नाही आणि थेट त्या युजर्सचे अकाऊंट थेट सस्पेंड कऱण्यात येईल. यासह ट्विटरवर ब्लू साईन अप कऱण्याची अट म्हणून हे स्पष्टपणे ओळखले जाईल, असे मस्क यांनी म्हटले आहे. तसेच जर कोणी ट्विटर युजरनेम बदलले तर त्याचे ब्लू टिक तात्पुरते काढून टाकण्यात येईल, असेही एलॉन मस्क यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community